Lokmat Agro >हवामान > High Tides यंदा किती दिवस समुद्र खवळणार अन् किती उंचीच्या लाटा उसळणार

High Tides यंदा किती दिवस समुद्र खवळणार अन् किती उंचीच्या लाटा उसळणार

How many days will the highest sea water speed this year and how much height of the high tide? | High Tides यंदा किती दिवस समुद्र खवळणार अन् किती उंचीच्या लाटा उसळणार

High Tides यंदा किती दिवस समुद्र खवळणार अन् किती उंचीच्या लाटा उसळणार

यंदा समाधानकारक पाऊस पडणार, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. त्यात २२ दिवस समुद्र खवळणार असून, ४.५ ते पाच मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. विशेषतः पावसाळ्यात समुद्रकिनारी, चौपाट्यांवर मोठ्या प्रमाणात पावसाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी होते.

शेअर :

Join us
Join usNext

यात काही अतिउत्साही तरुणाईमुळे अपघात होण्याची दाट शक्यता असते. हे लक्षात घेत अग्निशमन दल 'अलर्ट' मोडवर राहणार असून, सहा चौपाट्यांवर अग्निशमन दलाची फ्लड रेस्क्यू टीम तैनात राहणार आहे.

काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला आहे. विशेषतः पावसाळ्यात गिरगाव, दादर, जुहू, वर्सोवा, अक्सा आणि गोराई अशा प्रमुख चौपाट्या व समुद्रकिनारी पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दृष्टी संस्थेचे ९४ लाईफ गार्ड आपली जबाबदारी पार पाडत असतात.

खोल समुद्रात जाऊ नये, अशी सूचना चौपाटीवर तैनात लाईफ गार्ड पर्यटकांना करत असतात. तसेच समुद्रकिनारी, चौपाट्यांवर धोक्याचा लाल कपडा फडकवला जातो. तरीही अतिउत्साही पर्यटक खोल समुद्रात जाण्याचे धाडस करतात आणि स्वतः जीव धोक्यात घालतात.

हे अपघात टाळण्यासाठी पावसाळ्यात लाइफ गार्डच्या दिमतीला फायर ब्रिगेडचे जवान तैनात करण्यात येणार आहेत. फायर ब्रिगेडच्या फ्लड रेस्क्यू टीमबरोबर बोट, बुडणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी एक्वा आय सर्च मशीन उपलब्ध करण्यात येणार आहे.

दोन शिफ्टमध्ये जागता पहारा
• सहा चौपाट्यांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलाकडून दृष्टी लाइफ सेव्हिंग'च्या माध्यमातून १९४ लाइफ गार्ड तैनात ठेवणार आले आहेत, अग्निशमन दलाच्या देखरेखीखाली हे लाइफ गार्ड आपली जबाबदारी पार पाडणार आहेत. यासाठी सकाळी ७ ते रात्री १० वाजेपर्यंत दोन शिफ्टमध्ये लाइफ गार्ड तैनात राहणार आहेत.
• लाइफ गार्डला बॅकअप देण्यासाठी फायर ब्रिगेडच्या फ्लड रिस्पॉन्स टीम गवालिया टँक फायर स्टेशन, वांद्रे फायर स्टेशन, कुर्ला फायर स्टेशन, गोराई फायर स्टेशनवरून घटनास्थळी धाव घेणार आहेत.

अधिक वाचा: World Environment Day झाडे तुटली, पाणी संपले, ऊन वाढले; आता पुढे काय?

Web Title: How many days will the highest sea water speed this year and how much height of the high tide?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.