राज्यातील धरणांचा आज दिनांक ५ ऑक्टोबरपर्यंतचा पाणीसाठा ७५.७४% इतका आहे. मागच्या वर्षी याच तारखेपर्यंत हा साठा सुमारे ९० टक्के इतका होता.
राज्यातील कोकण विभाग, ( मुंबई, ठाणे), पश्चिम महाराष्ट्र (पुणे विभाग), उत्तर(नाशिक विभाग),मध्य महाराष्ट्र व विदर्भातील बहुतांशी धरणे ही बऱ्यापैकी क्षमतेने भरत आलेली आहेत. किंबहुना पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत. मात्र मराठवाडा विभागातील बहुतेक धरणांमध्ये पाणीसाठा सरासरी 50% च्या दरम्यान दिसून येत आहे.
घाट माथ्यावर बहुतेक धरणांच्या पाणलोट क्षेत्रात २-३ दिवसापासून पावसाने पूर्णपणे उघडीप दिल्याने धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक झालेली नाही. तसेच सध्या कोणत्याही मोठ्या धरणातून पाणी विसर्ग नदीत सोडण्यात आलेला नाही किंवा सुरू नाही.
दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ पर्यंत राज्यातील प्रमुख धरणांच्या पाणीसाठ्यांबाबतची माहिती पुढीलप्रमाणे आहे.
कोयना एकूण-:९४.३१ टीएमसी/(८९.५९%). उपयुक्त -:८९.१८ टीएमसी/(८९.०६%).
उजनी एकूण-९३.०४ टीएमसी /(७९.३६%). उपयुक्त-२९.३८ टीएमसी/(५४.८४%)
गोसीखुर्द(उप):१८.४७१ टीएमसी (७०.६६%)
जायकवाडी एकूण--:६२.७०२५ टीएमसी/(६१.०४%) उपयुक्त-:३६.६३६२ टीएमसी/(४७.७९%.) पाणी आवक (जायकवाडी) :००.१४८२/२४.१५२१ टीएमसी. संकलन :हरिश्चंद्र र. चकोर, कार्यकारी अभियंता (से.नि.) जलसंपदा विभाग