Lokmat Agro >हवामान > रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक?

रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक?

How much water is left in the reservoirs of the state at the face of rabi sowing? | रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक?

रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील धरणसाठ्यात किती पाणीसाठा शिल्लक?

मोठ्या, मध्यम, लघू धरणात आजपर्यंतचा पाणीसाठा...

मोठ्या, मध्यम, लघू धरणात आजपर्यंतचा पाणीसाठा...

शेअर :

Join us
Join usNext

रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील ६ महसूल विभागांमधील मोठ्या, मध्यम व लघू  धरणांचा आजपर्यंतचा धरणसाठा ७१.८४ टक्के इतका आहे. हा पाणीसाठा मागील वर्षी याच तारखेपर्यंत ९०.६९ टक्के होता.

राज्य सरकारने नुकताच १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात अनेक भागात चारा प्रश्न आवासून उभा राहतानाचे चित्र आहे. तसेच राज्यभरात धरणातील पाणी विसर्गावरून वाद सुरू असताना राज्यातील मोठ्या मध्यम व लघू धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे? जाणून घेऊया..

नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पूणे, कोकण विभागात एकूण १३९ मोठी धरणे असून २६० मध्यम व २५९५ लहान धरणे आहेत. 

जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राात रब्बी हंगामासाठी गोदावरी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रब्बी हंगामासाठी पाण्याची दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ४५.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा ९८५.५३ टीएमसी एवढा आहे.

 

 

Web Title: How much water is left in the reservoirs of the state at the face of rabi sowing?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.