रब्बी पेरण्यांच्या तोंडावर राज्यातील ६ महसूल विभागांमधील मोठ्या, मध्यम व लघू धरणांचा आजपर्यंतचा धरणसाठा ७१.८४ टक्के इतका आहे. हा पाणीसाठा मागील वर्षी याच तारखेपर्यंत ९०.६९ टक्के होता.
राज्य सरकारने नुकताच १५ जिल्ह्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात अनेक भागात चारा प्रश्न आवासून उभा राहतानाचे चित्र आहे. तसेच राज्यभरात धरणातील पाणी विसर्गावरून वाद सुरू असताना राज्यातील मोठ्या मध्यम व लघू धरणांमध्ये किती पाणीसाठा शिल्लक आहे? जाणून घेऊया..
नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक, पूणे, कोकण विभागात एकूण १३९ मोठी धरणे असून २६० मध्यम व २५९५ लहान धरणे आहेत.
जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्राात रब्बी हंगामासाठी गोदावरी पाटबंधारे विभागाने पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, रब्बी हंगामासाठी पाण्याची दोन आवर्तने सोडण्याचे नियोजन आहे. आज सकाळी १० वाजताच्या सुमारास ४५.४० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. धरणातील जिवंत पाणीसाठा ९८५.५३ टीएमसी एवढा आहे.