पैठण नाशिक जिल्ह्यात शुक्रवारी जोरदार पावसाने हजेरी लावल्याने तेथील धरण समूहातून विसर्ग करण्यात आला आहे. यामुळे गोदावरी नदीस हंगामातील पहिला पूर आला आहे. दुथडी भरून वाहणारे गोदावरीचे पाणी रस्त्यातील १४ बंधाऱ्यांचा आहे. अडथळा पार करून गतीने जायकवाडी धरणाकडे झेपावले आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान वैजापूर तालुक्यातील नागमठाण येथून पाणी पुढे सरकले होते. ते मध्यरात्री जायकवाडीत दाखल होणार असल्याचे उपविभागीय अभियंता अशोक चव्हाण यांनी सांगितले.
जायकवाडी धरणाच्या स्थानिक पाणलोट क्षेत्रात येणाऱ्या छत्रपती संभाजी नगर व अहमदनगर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने यंदा धरण नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील पाण्यावर अवलंबून होते. जायकवाडी धरणात केवळ ३२.५६ टक्के जलसाठा शिल्लक राहिल्याने नाशिकच्या पाण्याची यंदा प्रतीक्षा होती. दरम्यान शुक्रवारी नाशिक जिल्ह्यास मुसळधार पावसाने झोडपून काढले. यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरण समूहापैकी गंगापूर धरणातून ९०८८ क्युसेक्स, बंधारे आहेत. पालखेड धरणातून ४१८० क्युसेक्स, कडवा धरणातून ५४७४ क्युसेक्स विसर्ग करण्यात आला. हे सर्व पाणी नांदूर मधमेश्वर धरणात पोहोचल्यानंतर शुक्रवारी रात्री १० वाजता तेथून जायकवाडी धरणासाठी २४५७९ क्यूसेक्स क्षमतेने गोदावरीत विसर्ग करण्यात आला. यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून जायकवाडी धरणाच्या दिशेने झेपावली. नाशिक ते पैठण गोदावरी पात्रात १४ उच्च पातळी बंधारे आहेत.
यात तांदळज, मजूर, दत्त सागर, हिंगणा, डाऊख, सडे, शिंगवी, पुणतांबा, नेऊर, वांजरगाव, खानापूर, कमळापूर या बंधाऱ्याचा समावेश आहे. या बंधाऱ्याचे अडथळे पार करून गोदावरीचे पाणी शनिवारी सायंकाळी नागमठाणपर्यंत पोहोचले होते.
जायकवाडीच्या ऊर्ध्व भागातील धरणे भरली.....
• नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी २३ धरणे असून या धरणात सरासरी ९० टक्केपेक्षा जास्त जलसाठा झालेला आहे.
• यात दारणा ९६.२८ टक्के, मुकणे ८४.४६, बाकी ७१.५६, भाम १००, भावली १००, वालदेवी १००, गंगापूर ९५, कश्यपी १००, पालखेड ८१.६७, करंजखेड ८२.७३, ओझरखेड ७३.५७ टक्के असा जलसाठा झालेला असल्याने येथून पुढे पाऊस झाल्यास ते पाणी जायकवाडीस मिळणार
• स्थानिक पावसामुळे शनिवारी जायकवाडी धरणात २७३२ क्युसेक्स क्षमतेने आवक सुरू होती. असे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव व धरण अभियंता विजय काकडे यांनी सांगितले.