सेंटर फॉर सायन्स, टेक्नॉलॉजी अॅण्ड पॉलिसी या संस्थेच्या अहवालानुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यात उन्हाळ्यातील तापमान २०३० पर्यंत १ अंशाने आणि २०५० पर्यंत २ व त्यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता आहे.
उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील जिल्ह्यांना या तापमान वाढीचा सर्वाधिक फटका बसणार आहे. भारतीय हवामान विभाग आणि आयपीसीसीच्या १९९९ ते २०१९ च्या हवामान बदलाच्या आकडेवारीवरून आणि प्रदूषण वाढीच्या अभ्यासावरून २०५० पर्यंतच्या स्थितीचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
हवामान बदल जोखीम निर्देशांकात भारत ७ व्या आणि नैसर्गिक आपत्ती निर्देशांकात ३ ऱ्या स्थानी आहे. अनेक जिल्ह्यात पुराच्या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यांचे १ अंशापुढे वाढू शकते तापमान
जिल्हा : वाढ : प्रदूषण वाढल्यास
भंडारा : २.६ : २.०
अकोला : १.३ : २.५
अमरावती : १.६ : २.९
छ. संभाजीनगर : १.१ : २.९
बुलढाणा : १.४ : २.३
धुळे : १.१ : २.२
गोंदिया : १.१ : २.१
हिंगोली : १.२ : २.२
जळगाव : १.३ : २.५
नागपूर : १.१ : २.२
नंदूरबार : १.६ : २.५
वर्धा : १.१ : २.४
वाशिम : १.२ : २.३
यवतमाळ, धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यात १.१ ते १.४ अंशांपर्यंत तापमान वाढू शकते. प्रदूषण वाढल्यास जालना २.७, नाशिक २.४ अशी वाढ होऊ शकते.
किती टक्क्यांनी वाढू शकते पावसाचे प्रमाण
नाशिक - १५ ते १६
पुणे - २५ ते २९
रत्नागिरी - १७ ते २०
सातारा - १९ ते २४
सोलापूर - १५ ते १९
गडचिरोली - १९ ते २२
गोंदिया - ३३ ते ४३
नंदूरबार - ५७ ते ८१
धाराशिव - १८ ते ३२
पालघर -१९ ते ३१
पुणे - २० ते ३२
रायगड - २७ ते ४१
रत्नागिरी - ३२ ते ६१
सांगली - २३ ते ३३
ठाणे - २५ ते ४१
अधिक वाचा: मुलींचे वडील हयात असतानांही त्यांना शेतजमिनीत हिस्सा मिळू शकतो? काय आहे नियम; वाचा सविस्तर