हिवाळ्यातील हुडहुडी अचानक थंडीचा पारा घसरणे, कडाक्याच्या थंडीत स्वतः चे आणि कुटुंबियांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना योजणे गरजेचे झाले आहे. हिवाळ्यातील गारठा आपल्याला आजारी पाडू शकतो. सर्दी पडसे खोकला छातीतील कफ, ताप ही दुखणी मान वर काढू शकतात. वृद्ध आणि मुलांची प्रतिकार शक्ती कमी असल्याने ते या आजारांना पटकन बळी पडू शकतात.
थंडीच्या लाटेत काय करावे आणि काय करू नये
काय करावे
थंडीच्या लाटेपूर्वी
१) हिवाळ्यासाठी लागणारे पुरेसे कपडे तयार ठेवावे, अनेक थराने तयार केलेले कपडे देखील उपयुक्त आहेत.
२) शीत लहरीच्या रक्षणासाठी आपत्कालीन (Emergency) पुरवठा तयार ठेवावे.
थंडीच्या लाटेच्या दरम्यान
१) जास्तीत जास्त वेळ घरात रहावे, थंड वाराचा संपर्क/धोका टाळण्यासाठी प्रवास कमी करा.
२) आजु बाजुचा परीसर कोरडा ठेवावा. अंगावरील कपडे ओले झाल्यास/भिजले असल्यास, शरीराच्या उष्णतेचे नुकसान टाळण्यासाठी कपडे त्वरीत बदला.
३) हातमोजे पेक्षा मिटन्सला (जो पूरा हात कव्हर करतो) ला प्राधान्य द्या, कारण की मिटन्स थंडी पासून सुरक्षित ठेवण्यास व हात उबदार ठेवण्यास ज्यास्त उपयुक्त होते.
४) हवामानाच्या अद्यतन महितीसाठी रेडिओ ऐका, टीव्ही पहा व वर्तमानपत्रे वाचा.
५) गरम पेय नियमितपणे प्या.
६) वृद्ध लोक आणि मुलांची काळजी घ्या.
७) जल पुरवठ्याचे पाईप्स गोठू शकतात म्हणून पुरेसे पाणी साठवा.
८) थंडीमुळे/दंव बाधा झाल्याचे लक्षणांकडे लक्ष ठेवावे जसे बोटे, कानाची पाळे आणि नाकाचा शेंडा सुन्न व पांढऱ्या किंवा फिकट गुलाबी रंगाचे दिसणे.
९) दंव बाधामुळे प्रभावित झालेले भाग कोमट पाण्यात ठेवा, गरम पाण्यात ठेवू नका. शरीराचा जो भाग चांगला आहे त्या भागाचे तापमान नियंत्रीत ठेवावे.
१०) जर शारीराचे तापमान कमी झाले तर त्या व्यक्तीला उबदार जागी आणा आणि त्याचे कपडे बदला.
११) अशा व्यक्तीच्या शरीराला ब्लॅकेंट, गरम कपडे, टॉवेल्स, चादर किंवा कोरडी त्वचा ने संपर्कात आल्याने व्यक्तीचे शरीर उबदार होते.
१२) शरीराचे तापमान वाढविण्यात मदत करण्यासाठी कोमट पेय द्या. दारू देऊ नका.
१३) स्थिती आणखी बिघडल्यास वैद्यकीय मदत घ्या.
हे करू नका
१) मद्यपान करू नका. हे आपल्या शरीराचे तापमान कमी करते.
२) गोठलेल्या भागाला मालिश करु नका. यामुळे अधिक नुकसान होऊ शकते.
३) शरीर थरथर कापत असेल तर ह्या कडे दुर्लक्ष करू नका. शरीरातील उष्णता कमी होत आहे ह्याचे संकेत देण्याचे हे एक महत्त्वाचे पहिले चिन्ह आहे. खबरदारी म्हणून घरी त्वरेने परत जा.