Join us

हुडहुडी! विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पारा घसरला, राज्यात थंडी वाढणार

By मुक्ता सरदेशमुख | Published: December 15, 2023 8:49 AM

पुण्यात काल १४ अंश तर गोंदियामध्ये १३.२ अेंश तापमानाची नोंद

राज्यात गार वाऱ्यासह थंडीला सुरुवात झाली आहे. उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा घसरू लागला आहे. रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.  विदर्भ, मराठवाड्यासह, उत्तर महाराष्ट्रात तापमानात घसरण झाली आहे. किमान तापमान १५ अंशांहून खाली घसरले असून काल गोंदियामध्ये १३.२ अेंश तापमानाची नोंद झाली आहे. या आठवड्यात थंडी कायम राहणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

अग्नेय अरबी समुद्राला जोडून भारतीय उपसागरात चक्राकार वारे वाहत आहेत.या वाऱ्यामध्ये आर्दता असल्याने काठी ठिकाणी धुके पडणार असल्याचा अंदाज आहे. या आठवड्यात थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे.

काल,(दि १४) पुण्यात १४ अंश किमान तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगरही १४.६ अंश तापमानासह थंडीने गारठले होते. परभणीत १५.५ अंशांची काल नोंद झाली. विदर्भात नागपूर १४.४ अंश तर गोंदियात १३.२ अंशांवर तापमान घसरले होते.

दरम्यान, हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी राज्यातील किमान तापमानातील घट नोंदवली आहे.

पुढील काही दिवस राज्यातील हवामान कोरडे राहणार आहे.पुढील आठवड्यात देशासह राज्यात तापमानात काही प्रमाणात घट होणार आहे. सध्या उत्तर भरातात मोठ्या प्रमाणात गारठा वाढला आहे. तर काही राज्यात पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. 

टॅग्स :हवामानतापमान