महाराष्ट्रात या आठवडयात सर्वत्र पावसाने (Rain) दमदार हजेरी लावली असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. आज हवामान (Weather) खात्याने सांगितले की, मध्य महाराष्ट्रातील डोंगरी भागात पावसाचा रेड अलर्ट दर्शवित आहे. तर मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात रेड अलर्ट दाखविण्यात येत आहे. मुंबई, ठाणे, पालघर व कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट आहे. उर्वरित मराठवाड्यात यलो अलर्ट आहे. राज्यातील मुंबई, पुणे, सांगली, सातारा आणि कोल्हापूरसह कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचे भयावह रूप पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, अशी सूचना देण्यात आल्या आहेत.दुसरीकडे पुण्यात या आठवड्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून अतिरिक्त पाण्याचा विसर्ग करावा लागला. परिणामी याचा फटका शहाराला बसला. हवामान विभागाने पुणे शहरासाठी २७ जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. यासह मध्य महाराष्ट्रातील डोंगरी भागात पावसाचा रेड अलर्ट आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भागात रेड अलर्ट आहे.मुंबई, ठाणे, पालघर व कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट, उर्वरित मराठवाड्यात यलो दर्शविण्यात आला. दुसरीकडे २८, २९ आणि ३० जुलैसाठी पुण्याला यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, या तीन दिवसांत शहरासह घाट परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर मध्य महाराष्ट्रातील डोंगरी भागात पावसाचा रेड अलर्ट असल्याने तेथील नागरिकांनी काळजी घ्यावी.
IMD Weather Forecast And Rain Updates: आज कुठे कोणता अलर्ट आहे नक्की वाचा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2024 12:16 PM