आज राज्यात कुठं किती पाऊस पडणार आहे. याचा हवामान अंदाज विभागाने (IMD) वर्तविला आहे. आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे.
अनेक ठिकाणी या पावसामुळे नदी नाले दुथडी भरुन वाहत आहेत. धरणांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ होताना दिसते आहे. दरम्यान, हवामान विभागानं (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही राज्यात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
येथे मुसळधार पावसाचा इशारा
आज मुंबईसह ठाणे पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या तीन जिल्ह्यात देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर विदर्भाच्या काही भागात वीजेच्या कडकडाटसह जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे पावसाचा यलो अलर्ट या भागात जारी करण्यात आला आहे. त्यामुळं नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.