राज्यात पूर्व विदर्भात ४ जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह हलक्या व मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पाच जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटांचा अलर्ट देण्यात आला आहे. उर्वरित भागात कोरड्या हवामानाची शक्यता असून तापमानात पुढील पाच दिवसात २ ते ३ अंशाने कमी होण्याचा अंदाज आहे.
सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या केरळ आणि लगतच्या परिसरात सक्रीय असून समुद्रसपाटीपासून ५.८ किमी अंतरावर आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडविरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर जिल्ह्यात आज तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे.
धुळे, जळगाव, अकोला, अमरावती जिल्ह्यात उष्णतेच्या लाटांचा इशारा देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस अकोल्यात उष्णतेची लाट राहणार असून त्यानंतर तापमानात २ ते ३ अंशांची घट होणार आहे.
सध्या बंगालच्या उपसागरावर पूर्व मध्यवर्ती भागात कमी दाबाचा पट्टा तयार असून मुंबईत ८ ते ९ जून रोजी मान्सून सुरू होण्याची शक्यता आहे. ५ ते ६ जूनच्या आसपास मान्सूनपूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे.