Lokmat Agro >हवामान > कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

In Kolhapur, due to heavy rainfall in the dam area, the level of rivers has risen rapidly | कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात जोरदार पाऊस नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे.

जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

कोल्हापूर : जिल्ह्यात रविवारी सकाळपासून संततधार सुरू आहे. धरणक्षेत्रातही जोरदार पाऊस कोसळत असल्याने नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पंचगंगा ३० फुटांच्या वरून वाहत असून, यंदा पहिल्यांदाच पाणी पात्राबाहेर पडले आहे. तब्बल ४८ बंधारे पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक काहीशी विस्कळीत झाली आहे.

रविवारी सकाळच्या तुलनेत ११ वाजल्यापासून एकसारखा पाऊस सुरू आहे. दिवसभर संततधार कोसळत असून, कोल्हापूर शहरात सगळीकडे पाणीच पाणी साचले आहे. गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी, पन्हाळा, चंदगड, भुदरगड तालुक्यात पावसाचा जोर अधिक आहे.

राधानगरी धरण ४२% भरले असून, त्यातून वीजनिर्मितीसाठी प्रतिसेकंद १२५० तर वारणा धरणातून ६७५ घनफूट पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर पडले असून, आजूबाजूच्या शेतात घुसू लागले आहे.

कोदे धरण भरले
जिल्ह्यात आतापर्यंत चंदगड तालुक्यातील घटप्रभा, जांबरे धरणे भरली आहेत. रविवारी सकाळी गगनबावडा तालुक्यातील कोदे हा लघू पाटबंधारा पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यातून प्रतिसेकंद ४०० घनफुटाचा विसर्ग सुरू आहे.

दिवसभरात १५ बंधारे पाण्याखाली
रविवारी सकाळी ७ वाजता पंचगंगा नदीची पातळी २८ फुटांपर्यंत होती, दिवसभरात दोन फुटांची वाढ होत असतानाच तब्बल १५ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

Web Title: In Kolhapur, due to heavy rainfall in the dam area, the level of rivers has risen rapidly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.