Join us

यावर्षी देशात दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण महाराष्ट्रात.. वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 11:06 AM

Highest Rainfall in Maharashtra चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजने पर्जन्यमानात आठ हजार मिलिमीटर पावसाची सरासरी पार केली आहे.

शिराळा : Highest Rainfall in Maharashtra चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाथरपुंजने पर्जन्यमानात आठ हजार मिलिमीटर पावसाची सरासरी पार केली आहे.

पर्जन्यमानात कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर व वलवण या चारही अतिपावसाच्या ठिकाणांना मागे टाकत देशात यावर्षी दुसऱ्या क्रमांकावर सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण म्हणून पुढे आले आहे.

पाथरपुंज येथे ९ ऑक्टोबर रोजी ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आणि एकूण आठ हजार मिमीचा टप्पा पार केला आहे. कोयनानगर (जि. सातारा) कोयना पाणलोट क्षेत्रामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद या अगोदर होत होती.

मात्र वारणावती वसंत सागर जलाशयलाच्या क्षेत्रात असलेल्या पाथरपुंजमध्ये २०१९ पासून रेकॉर्डब्रेक पाऊस पडत आहे. त्यामुळे येथे किती पाऊस पडतो याकडे अनेकांचे लक्ष असते. यंदाच्या मौसमात पाथरपूंजमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. आठ हजार मि.मि. चा टप्पा पार केला.

पाथरपुंज येथे वर्षात पडलेला एकूण पाऊस मिमीमध्ये■ २०१४-१५ - ६९६८■ २०१५-१६ - ४०८०■ २०१६-१७ - ७१७५■ २०१७-१८ - ६२९०■ २०१८-१९ - ५५५०■ २०१९-२० - ९९५६■ २०२०-२१- ६४३३■ २०२१-२२ - ७०२३■ २०२२-२३ - ६९६८■ २०२३-२४ - ५७२६

वारणा खोऱ्यातील निवळी, धनगरवाडा व पाथरपुंज हे तीन रेनगेज स्टेशन येतात, त्यातील निवळी व पाथरपुंज येथील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली आहेत. त्यातील निवळी व पाथरपुंज या ठिकाणी पडणारा पाऊस महत्त्वाचा आहे. यावर्षी पाथरपुंज येथे आज अखेर ८ हजार २२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आजपर्यंतचा विक्रमी दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडला आहे. - गोरख पाटील, शाखाधिकारी चांदोली पाटबंधारे

टॅग्स :पाऊसमहाराष्ट्रशिराळाहवामानकोयना धरणधरणमहाबळेश्वर गिरीस्थान