Join us

मराठवाड्यातील या ६ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, पुढील दोन दिवस मुसळधार..

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 4:40 PM

प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवलेल्या अंदाजानुसार दि २० मे ते २२ मे पर्यंत इथे होणार पाऊस

सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती मध्य महाराष्ट्राला जोडून परिसरात असल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. मराठवाड्यात पुढील दोन दिवसात काही जिल्ह्यांना वादळी वाऱ्यसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मोसमी पाऊस अंदमान निकोबारसह बंगालच्या उपसागरात रविवारी दाखल झाला. त्यामुळे तमिळनाडू, केरळ परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून येत्या १० दिवसात म्हणजे ३१ मे पर्यंत मोसमी वारे केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात दरम्यान अवकाळी पावसाला पोषक स्थिती तयार झाली असून बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार दिनांक २० मे २०२४ धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, जालना, बीड व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ४० ते ५० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

दिनांक २१ मे २०२४ : परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तर दिनांक २२ मे २०२४ : लातूर, धाराशिव व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी ३० ते ४० कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :पाऊसहवामानमराठवाडा