Join us

मराठवाड्यातील या जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, तूरळक ठिकाणी गारपीटही...

By मुक्ता सरदेशमुख | Published: March 19, 2024 3:31 PM

काढणी केलेल्या ज्वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची काळजी घ्या...

राज्यात पूर्व विदर्भासह मराठवाड्यातही अवकाळी पावसासही गारपीटीचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, परभणी, हिंगोली, लातूर व नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वाऱ्याचा वेग अधिक (ताशी 30 ते 40 कि.मी.) राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता आहे.

मराठवाडयात पुढील पाच दिवसात कमाल तापमानात व किमान तापमानात हळूहळू 2 ते 3 अं. से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शेतकऱ्यांनी पशूधनासाठी या शिफारशी केल्या आहेत.

तूरळक ठिकाणी वादळीवाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची तसेच नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी केलेल्‍या ज्‍वारीचा कडबा पावसात भिजणार नाही याची दक्षता घ्‍यावी. कारण पावसात भिजल्‍यास त्‍याची प्रत खालावून साठवण क्षमता कमी होते व भिजलेला कडबा जनावरे खात नाहीत.

नांदेड जिल्हयात तूरळक ठिकाणी गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, चेतावनीच्या काळात जनावरे शक्यतो चरावयास बाहेर नेऊ नयेत. जनावरांना उघडयावर सोडू किंवा बांधू नये, निवाऱ्याच्या ठिकाणी बांधावे व पावसात भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

आपल्या पशुंना उन्हामध्ये बांधु नका (निदान तिव्र उन्हाच्या कालावधीमध्ये त्यांना झाडाखाली/सावलीमध्ये किंवा शेड/गोठ्यामध्येच बांधणे चांगले). पशुंना शक्यतो थंड/स्वच्छ/मुबलक पाणी दोन-तिन वेळेस पाजावे. पाण्यामुळे पशुंच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी (डीहायड्रोजन) होणार नाही. 

 

टॅग्स :पाऊसगारपीटमराठवाडा