राज्यात उष्णतेचा पारा वाढत असून, कमाल आणि किमान तापमानांत सरासरीपेक्षा दोन ते चार अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यात शुक्रवारी सोलापूर येथे सर्वाधिक कमाल व किमान तापमानाची नोंद झाली. येथे कमाल ४३.१, तर किमान २७.५ अंश सेल्सिअस तापमान होते.
मराठवाडा व विदर्भातही तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढे गेला असून, पुढील दोन दिवस विदर्भात आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
एप्रिलच्या सुरुवातीपासूनच राज्यात बहुतांश शहरांमध्ये कमाल तापमान ४० अंशांच्या पुढे सरकले आहे.
राज्यात शुक्रवारी सर्वाधिक तापमान सोलापूर येथे ४३.१ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. त्या खालोखाल चंद्रपूर ४२.४, तर वर्धा ४२.१, ब्रह्मपुरी व यवतमाळ येथे ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
विदर्भातील बुलढाणा वगळता बहुतांश शहरांमध्ये तापमानाचा पारा चाळीस अंशांच्या पुढे आहे. मराठवाड्यातील बीड, परभणी, धाराशिव शहरांमध्येही तापमानाचा पारा ४१ अंशांच्या पुढे असल्याचे दिसून येत आहे.
पुण्याचा पारा चाळिशीत
पुणे, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा येथेही तापमान जवळपास ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये सरासरी कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाहू लागला असून, भर दुपारी रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत आहे. मात्र, विदर्भ-मराठवाड्यात याच तापलेल्या वातावरणात प्रचारसभांनी जोर धरलाय.
कमाल तापमानात पाच अंशांची वाढ
■ कमाल तापमानात वाढ झालेली असताना किमान तापमानातही सरा-सरीपेक्षा दोन ते पाच अंश सेल्सिअसने वाढ झालेली दिसून येत आहे.
■ राज्यात सोलापूर येथेच सर्वाधिक किमान तापमान २७.५ अंश सेल्सिअस नोंदविले. नांदेड येथे २६.८, वर्धा येथे २६ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले. त्यामुळे रात्री असह्य उकाडा जाणवत आहे.
पुण्याचा पारा चाळिशीत
पुणे, कोल्हापूर, मालेगाव, सांगली, सातारा येथेही तापमान जवळपास ४० अंशांपर्यंत पोहोचले आहे. राज्यातील बहुतांश शहरांमध्ये सरासरी कमाल तापमानात दोन ते चार अंश सेल्सिअसची वाढ झाली आहे. उन्हाचा चटका वाहू लागला असून, भर दुपारी रस्त्यांवरील गर्दी कमी होताना दिसत आहे. मात्र, विदर्भ-मराठवाड्यात याच तापलेल्या वातावरणात प्रचारसभांनी जोर धरलाय.
राज्यातील कमाल, किमान तापमान
पुणे | ३९.६ | १९.८ |
नगर | ३८.८ | १९.७ |
जळगाव | ३७.९ | - |
कोल्हापूर | ४०.२ | २४.८ |
महाबळेश्वर | ३३.६ | २२.१ |
मालेगाव | ४०.८ | २१.६ |
नाशिक | ३७.२ | १९.४ |
सांगली | ४१.० | २४.८ |
सातारा | ३९.७ | २३.६ |
सोलापूर | ४३.१ | २७.५ |
मुंबई | ३२.५ | २४.३ |
धाराशिव | ४०.६ | २४.८ |
संभाजीनगर | ३९.४ | २३.८ |
परभणी | ४१.४ | २५.६ |
बीड | ४१.५ | २४.५ |
अकोला | ४१.८ | २४.५ |
अमरावती | ४०.६ | २२.७ |
बुलढाणा | ३७.५ | २५.० |
ब्रह्मपुरी | ४२.० | २३.२ |
चंद्रपूर | ४२.२ | २३.२ |
गोंदिया | ४०.३ | २१.८ |
नागपूर | ४१.४ | २२.३ |