Join us

भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:34 AM

भारतीय हवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती झाली असून, पदभारही त्यांनी स्वीकारला आहे.

भारतीयहवामान अंदाज विभागाच्या प्रमुखपदी डॉ. मेधा खोले यांची नियुक्ती झाली असून, पदभारही त्यांनी स्वीकारला आहे. त्यांची पीएच. डी. चक्री वादळ विषयामध्ये आहे. डॉ. अनुपम कश्यपी ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त झाले होते, त्यानंतर हे पद रिक्त होते.

डॉ. खोले यांनी भारतीयहवामानशास्त्र विभागात यापूर्वीदेखील कार्य केले आहे. पुणे वेधशाळेच्या २००७ मध्ये त्या संचालिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी पहिली नियुक्ती मुंबईमध्ये कुलाबा हवामान विभागात झाली. त्यानंतर १९९५ मध्ये पुणे हवामान विभागात वरिष्ठ हवामानशास्त्रज्ञ म्हणून कार्यरत होत्या.

त्यांचे चक्री वादळ आणि हवामान यामध्ये संशोधन कार्य असून, त्याचा उपयोग विभागाला होत आहे. आता त्या पुण्याच्या हवामान अंदाज विभाग प्रमुख म्हणून काम करीत आहेत.

पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमधून मराठी माध्यमातून त्यांनी शिक्षण घेतले आणि फर्ग्युसन कॉलेजमधून भौतिकशास्त्र विषयातून पदवी मिळविली. त्यानंतर एमएससी आणि पीएच. डी. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून प्राप्त केली.

टॅग्स :हवामानचक्रीवादळभारतपुणेमुंबई