Join us

पुन्हा अवकाळी येतोय? ढगांच्या गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2024 3:03 PM

महाराष्ट्रात थंडी वाढण्याची स्थिती कायम आहे. तसेच, राज्यामध्ये काही भागांमध्ये ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

उत्तर भारताकडून पश्चिम दिशेकडून प्रवाही झोताचे 'पश्चिमी' वारे वाहत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढण्याची स्थिती कायम आहे. तसेच, राज्यामध्ये काही भागांमध्ये ९ फेब्रुवारी ते १२ फेब्रुवारीदरम्यान संपूर्ण मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरणासहित तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटीसह मध्यम पावसाची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.

पुण्यात येत्या दोन-तीन दिवसांमध्ये किमान व कमाल तापमानात चढ-उतार होण्याची शक्यता आहे. सध्या तरी पुण्यातील किमान तापमान १५ अंश सेल्सिअसच्या वर नोंदवले जात आहे. सध्या मराठवाड्यात, खान्देश, कोकणात ढगाळ वातावरण आहे. इतर ठिकाणी मात्र आकाश निरभ्र राहणार आहे.

पश्चिमी झंझावातामुळे काही ठिकाणी पाऊस, हिमवृष्टी होण्याची शक्यता आहे. परिणामी थंडीमध्ये वाढ होऊ शकते. मध्य भारतामध्ये थंडी असून, विदर्भाशेजारील छत्तीसगड, ओडिसा या राज्यांवर हवेचे उच्च दाब क्षेत्र बनले आहे.

टॅग्स :हवामानपाऊसविदर्भमराठवाडामहाराष्ट्रतापमान