Lokmat Agro >हवामान > Jagtik Tapman Vadh : तापमान वाढीमुळे २०२४ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरणार

Jagtik Tapman Vadh : तापमान वाढीमुळे २०२४ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरणार

Jagtik Tapman Vadh: 2024 will be the hottest year ever due to global warming | Jagtik Tapman Vadh : तापमान वाढीमुळे २०२४ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरणार

Jagtik Tapman Vadh : तापमान वाढीमुळे २०२४ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरणार

सातत्याने तापमान वाढ होत असल्याने २०२४ हे साल सर्वात उष्ण वर्ष ठरणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचा दावा 'कोपर्निकस' या युरोपीय हवामान बदल संस्थेने केला आहे.

सातत्याने तापमान वाढ होत असल्याने २०२४ हे साल सर्वात उष्ण वर्ष ठरणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचा दावा 'कोपर्निकस' या युरोपीय हवामान बदल संस्थेने केला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

नवी दिल्ली: सातत्याने तापमान वाढ होत असल्याने २०२४ हे साल सर्वात उष्ण वर्ष ठरणार असल्याचे जवळपास निश्चित असल्याचा दावा 'कोपर्निकस' या युरोपीय हवामान बदल संस्थेने केला आहे.

यंदाचे सरासरी तापमान औद्योगिक पूर्व काळाच्या तुलनेत किमान १.५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असेल. इतिहासातील हे दुसरे वर्ष असेल ज्याचा ऑक्टोबर महिना सर्वाधिक उष्ण ठरला असल्याचे या संस्थेने म्हटले आहे.

अजरबैजानच्या बाकू शहरात ११ नोव्हेंबर रोजी संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदल परिषदेला सुरुवात होणार आहे. 'कोपर्निकस' संस्थेने २०२४ हे सर्वांत उष्ण वर्ष ठरणार असल्याची घोषणा केली आहे.

या परिषदेत हवामान बदलाचा सामना करण्यासाठी नवीन आर्थिक सहकार्य नकारारावर एकमत होण्याची अपेक्षा आहे. या करारानुसार २०२५ या वर्षापासून विकसित देश हवामान बदलाचा सामना करण्यासाठी विकसनशील देशांना मदत करणार आहेत.

तापमानात सातत्याने होणारी वाढ चिंताजनक असल्याचे निरीक्षण कोपर्निकस संस्थेचे संचालक कार्लो बुओनटेंपो यांनी नोंदवले आहे. वातावरणातील हरितगृह वायूत सातत्याने वाढ झाली नसती तर तापमान वाढदेखील झाली नसती.

ग्लोबल वॉर्मिंगमुळे पृथ्वीवरील तापमानात विक्रमी वाढ होत असल्याबद्दल बुओनटेंपो यांनी चिंता व्यक्त केली. तापमानातील चढउताराच्या मालिकेतून वाईट संकेत मिळत असल्याचा दावा आहे.

दिल्लीतील हवा 'अत्यंत खराब'
राजधानी दिल्लीतील हवेची गुणवत्ता गुरुवारी अत्यंत खराब नोंदवण्यात आली. सकाळी नऊच्या सुमारास हवा गुणवत्ता निर्देशांक अर्थात एक्यूआय ३६७ नोंदविण्यात आला. आनंद विहार, अशोक विहार, बवाना, जहांगीरपुरी, मुंडका, रोहिणी, सोनिया विहार, विवेक विहार, वाजीपूर या नऊ केंद्रांतील एक्यूआय गंभीर श्रेणीत नोंदविण्यात आला.

Web Title: Jagtik Tapman Vadh: 2024 will be the hottest year ever due to global warming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.