देशात तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये ७ ते १० अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद होत असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. दरम्यान, राज्यातही किमान तापमान घसरले असून आज जळगावमध्ये १२ अंश तापमानाची नोंद झाली.
सध्या दक्षिण बांग्लादेश व परिसरात चक्राकार वारे वाहत आहेत. त्यामुळे झालेल्या बदलांमुळे किमान तापमान घसरत आहे. कमाल तापमान वाढल्याचे पहायला मिळत आहे. विदर्भात ३१ डिसेंबर ते २ जानेवारीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.
बहुतांश राज्यात तापमानात घट झाल्याचे चित्र आहे. अनेक भागात रस्त्याच्या कडेला शेकोट्या पेटल्या आहेत. किमान तापमानात ही घट असली तरी कमाल तापमानात चढ उतार दिसून येत आहेत. सामान्य तापमानाच्या तूलनेत हे तापमान १ ते २ अंशांने अधिक असल्याचे हवामान विभागाच्या दैनंदिन अहवालावरून दिसून येत आहे.
मराठवाड्यात येत्या आठवड्यात हवामान कोरडे राहणार असून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये १३.६ अंशांची नोंद झाली. जळगावात आज १२.६ अंशांची नोंद झाली. किमान तापमान बहुतांश ठिकाणी १५ अंशांच्या खाली असल्याचे दिसून येत आहे.
आज राज्यातील किमान तापमान किती होते?
| ||
Station | Max Temp (oC) | Min Temp (oC) |
Ahmednagar | 31.0 (26/12) | 13.4 |
Alibag | 31.0 (26/12) | 18.0 |
Aurangabad | 31.2 (26/12) | 13.6 |
Beed | 29.7 (26/12) | 13.3 |
Dahanu | 33.0 (26/12) | 19.0 |
Harnai | 31.4 (26/12) | 23.2 |
Jalgaon | 30.2 (26/12) | 12.6 |
Jeur | 34.0 (26/12) | 13.0 |
Kolhapur | 31.1 (26/12) | 17.0 |
Mahabaleshwar | 28.8 (26/12) | 16.1 |
Malegaon | 29.8 (26/12) | 15.4 |
MOHOL | -- | 11.5 |
Mumbai-Chembur | 34.1 (26/12) | NA |
Mumbai-Colaba | 33.2 (26/12) | 22.2 |
Mumbai-Santacruz | 35.7 (26/12) | 19.8 |
Nanded | 30.2 (26/12) | 14.6 |
NANDURBAR KVK | -- | 15.3 |
Nasik | 32.9 (26/12) | 14.2 |
Osmanabad | -- | 15.2 |
PALGHAR | -- | 18.7 |