Lokmat Agro >हवामान > Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

Jayakawadi Dam Update: latest news Why is the water level of Jayakawadi Dam decreasing? Know the reason | Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

Jayakawadi Dam: जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत का होतेय घट; जाणून घ्या कारण

Jayakawadi Dam : मागील काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणातील (Jayakawadi Dam) पाणी साठ्यावर होताना दिसत आहे. जाणून घ्या सध्या धरणातील पाणीपातळी (water level) किती आहे ते सविस्तर

Jayakawadi Dam : मागील काही दिवसांपासून उष्णतेचा तडाखा वाढताना दिसत आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणातील (Jayakawadi Dam) पाणी साठ्यावर होताना दिसत आहे. जाणून घ्या सध्या धरणातील पाणीपातळी (water level) किती आहे ते सविस्तर

शेअर :

Join us
Join usNext

दादासाहेब गलांडे

पैठण तालुक्यातील तापमान ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असताना जायकवाडी धरणातील (Jayakawadi Dam) पाण्याचे बाष्पीभवनही दररोज होणाऱ्या पाणी उपशापेक्षा ६ पट वाढले आहे. त्यामुळे धरणातीलपाणीपातळी (water level) झपाट्याने कमी होत आहे.
 
पैठण तालुक्यात मागील काही दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढला आहे. त्याचा परिणाम जायकवाडी धरणाच्या (Jayakawadi Dam) पाणीसाठ्यावर होताना दिसत आहे. सध्या जायकवाडी धरणातील पाणीसाठा (water level) मागील वर्षापेक्षा यावर्षी दोन पटींनं जास्त आहे.

मागील वर्षी १५ एप्रिल रोजी धरणात फक्त १५.२० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात याच दिवशी ४७.३९ टक्के पाणीसाठा आहे. धरणात सध्या १७६७.०१ दलघमी पाणीसाठा असून त्यात १०२८.९० दलघमी उपयुक्त पाणीसाठा आहे.  (water level)

मागील वर्षासाठी जायकवाडी धरणात (Jayakawadi Dam) अल्प प्रमाणात पाणी असल्यामुळे सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले नव्हते. तसेच पिण्याच्या पाण्यातही काही ठिकाणी कपात करण्यात आली होती.

जायकवाडी धरणातून छत्रपती संभाजीनगर एमआयडीसी, वाळूज, शेंद्रा, बिडकीन, चितेगाव, पैठणसह डीएमआयसी तसेच जालनासह विविध शहरांना पाणीपुरवठा केला जातो. यासाठी दररोज केवळ ०.२९ दलघमी पाणी उपसा केला जातो; मात्र उष्णता वाढल्यामुळे दररोज जायकवाडी धरणातील पाण्याचे बाष्पीभवनही वाढले आहे. (water level)

मार्च महिन्यात ५५.२८५ दलघमी बाष्पीभवन झाले असून मंगळवारी बाष्पीभवनाचा वेग १.९८८ दलघमी होता. यावर्षी जायकवाडी धरण १०० टक्के भरले होते. धरणात १११.२५५६ टीएमसी पाणी आले. तर विसर्ग धरणातून ८६२.९६१५ टीएमसी पाणी गोदापात्रात सोडण्यात आल्याचे शाखा अभियंता विजय काकडे म्हणाले.

तापमान ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाणार?

पैठण तालुक्यातील तापमान कमालीचे वाढले आहे. पुढील काही दिवसांत तापमानाचा पारा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत जाण्याचा अंदाज हवामानाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

१५ एप्रिल रोजी मागील वर्षी धरणात फक्त १५.२० टक्के पाणीसाठा होता. यावर्षी धरणात याच दिवशी ४७.३९ टक्के पाणीसाठा आहे.

२४३.७३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन

जायकवाडी धरणातील पाण्याचे डिसेंबर २०२४ मध्ये २०.६१४ दलघमी बाष्पीभवन झाले तर जानेवारीमध्ये २०२५ मध्ये २४.६६८ दलघमी, फेब्रुवारीत २९.८१४ दलघमी, मार्चमध्ये ५५.२८५ दलघमी बाष्पीभवन झाले. १ जुलै २०२४ ते आजपर्यंत जायकवाडी धरणातील २४३.७३ दलघमी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

जायकवाडी धरणात आज रोजी ४७.३९ टक्के पाणीसाठा असून, डाव्या कालव्यातून २१५० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बाष्पीभवनाचा आजचा वेग १.९८८ दलघमी आहे. धरणातून पिण्यासाठी जेवढे पाणी दररोज उपसले जाते, त्याच्या सहा पटींनी बाष्पीभवन होत आहे. यावर्षी धरणात मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा असल्यामुळे सिंचन व पिण्याच्या पाण्यात कपात केली जाणार नाही. - विजय काकडे, शाखा अभियंता

हे ही वाचा सविस्तर : Godavari River: 'गोदावरी'चा मराठीत अहवाल नाहीच; आक्षेप दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस वाचा सविस्तर

Web Title: Jayakawadi Dam Update: latest news Why is the water level of Jayakawadi Dam decreasing? Know the reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.