Jayakwadi Dam: मराठवाड्यातील हजारो गावांची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचापाणीसाठा वेगाने कमी होत आहे. एप्रिलच्या सुरुवातीला (दि ३) तो आता अवघ्या २०.२७ टक्क्यांवर आला आहे. उन्हाची तीव्रता वाढत असून पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी नागरिकांसह शेतकऱ्यांना पाण्याची वाट पहावी लागत आहे.
जायकवाडी धरणात आज सकाळी ८.११ वाजता १६.८ टीएमसी पाणी शिल्लक होते. मागील वर्षी याच दरम्यान हा पाणीसाठा ५२ . ३६ टक्के होता. तो आता २०.२७ टक्के एवढा आहे. वाढत्या तापमानामुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने होत आहे. याशिवाय शेती व पाणीपुरवठ्याच्या योजनांसाठी उपसले जाणारे पाणी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी होणारा उपसा अशा वेगवेगळ्या कारणांनी पाणी वापरले जात आहे.
निळवंडे धरणात आता केवळ १२.९२ टक्के, मुळा, भंडारदरा किती?
नांदेड पाटबंधारे मंडळांतर्गत असलेल्या नांदेड, हिंगोली, यवतमाळ व परभणी जिल्ह्यातील लहान-मोठ्या १४४ प्रकल्पांमध्ये आजघडीला ११०४.५६ दलघमी म्हणजे ४०.१४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे भविष्यात नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढल्याने भूगर्भातील पाणीपातळीत झपाट्याने घट होत आहे.