Join us

Jayakwadi Dam:गतवर्षी जायकवाडीत मध्य एप्रिलला होते ५२.३६ टक्के, आज काय स्थिती?

By मुक्ता सरदेशमुख | Published: April 15, 2024 11:55 AM

अवकाळी पाऊस ओसरला असून १५ एप्रील रोजी जायकवाडी धरणात आता एवढे पाणी शिल्लक..

मराठवाड्याची पाण्याची तहान भागवणाऱ्या व विभागातील सर्वात मोठ्या जायकवाडी धरणामध्ये गतवर्षीच्या तुलनेत ३७.१७ टक्क्यांची जलतूट असून सध्या जायकवाडी धरणात १५.१९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. मागील वर्षी याच दरम्यान तो ५२.३६ टक्के एवढा होता.

गारपीट, अवकाळी पाऊस आणि हवामान बदलांच्या असंख्य बदलांनंतर आता राज्यात तापमानवाढीला सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह सिंचन, बिगरसिंचनासाठी धरणसाठ्याचे नियोजन केले जात असताना जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ५३८.५४ दलघमी एवढा उरला आहे.

मराठवाड्यातील सुमारे ४०० हून अधिक गावांची तहान जायकवाडी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. २१७० दशलक्ष घनमीटर क्षमता असणाऱ्या विभागातील सर्वात मोठ्या धरणात आता  आज दि.१५ एप्रिल २०२४ रोजी २४.८१ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. ऐन उन्हाळ्यात पाण्याची अशी स्थिती असल्याने शेतीसाठी पाणी पुरेल का अशी चिंता व्यक्त करण्यात येत आहे....

मराठवाड्यातील जायवाडी धरणासह इतर लघू, मध्यम व मोठ्या ९२० धरणप्रकल्पांमध्ये आता केवळ १६.४९ टक्के पाणी राहिले असून राज्यातील इतर धरणांच्या तुलनेत हा पाणीसाठा सर्वात कमी असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते.

टॅग्स :जायकवाडी धरणपाणीपाणीकपातपाणी टंचाई