Join us

Jayakwadi Dam: जायकवाडीतून 'इतके' हजार क्युसेक विसर्ग; सिद्धेश्वर मंदिरात शिरले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2024 7:58 PM

मागील दोन दिवसांपासून जायकवाडी धरण परिसरात सतत पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. (Jayakwadi Dam)

Jayakwadi Dam :

पैठण :

मागील दोन दिवसांपासून जायकवाडी धरण परिसरात सतत पावसामुळे येथील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. जायकवाडी धरणात वरच्या धरण समूहातून येणाऱ्या पाण्याची आवक ४४ हजार ७५२ क्युसेक वेगाने होत असल्याने गुरुवारी धरणातून गोदापात्रात सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा ५७ हजार ९२ क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

धरणातील पाणीसाठा ९९.३९ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाचे १८ दरवाजे मंगळवारी मध्यरात्री तीन फुटांनी उघडून त्यामधून १९ हजार ९९२ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

पाण्याचा विसर्ग वेगाने होत असल्यामुळे धरणाच्या बाजूला असलेल्या कावसानकडे जाणाऱ्या दगडी पुलावरून पाणी वाहत आहे. या मार्गावरीलवाहतूक बंद झाली आहे.

प्राचीन सिद्धेश्वर मंदिरात पाणी शिरले आहे. नाथ मंदिराच्या पाठीमागील दशक्रिया घाटाच्या पायऱ्या पाण्यात गेल्या आहेत. त्यामुळे येथील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

गोदावरी दुथडी भरून वाहू लागली

• गोदावरी नदी दुथडी भरून वाहत आहे. धरणात पाण्याची आवक आणखी वाढल्यास पाण्याचा विसर्गही वाढण्याची शक्यता आहे.

• सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धरणाकडे जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्स लावून पर्यटकांची वाहने थांबविण्याचे आदेश दिले आहेत.

टॅग्स :शेती क्षेत्रधरणजायकवाडी धरणपैठणशेतकरी