Join us

Jayakwadi Dam Storage : जायकवाडी धरणात पाणीच पाणी; प्रशासन अलर्ट मोडवर वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2024 4:43 PM

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने तीन तालुक्यांतील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.(Jayakwadi Dam Storage)

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढल्याने तीन तालुक्यांतील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मागील तीन दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे सिल्लोड, सोयगाव कन्नड आणि पैठण या तालुक्यांमध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनावरे दगावली आहेत.

नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी प्रशासन सध्या अलर्ट मोडवर काम करीत आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सहा जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे. जायकवाडी धरण ९० टक्क्यांपेक्षा जास्त भरल्याने कोणत्याही क्षणी धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो.

मुख्यालयी राहण्याचे आदेश

तालुका व गावपातळीवरील यंत्रणांनी मुख्यालयी राहून आपत्कालीन परिस्थितीत समन्वयाने काम करावे. पूरपरिस्थितीमुळे स्थलांतर करण्याची गरज भासल्यास त्यासाठी जागा निश्चित करावी. सुविधा उपलब्ध होतील, याची तहसीलदारांनी खात्री करावी. -दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी

पंचनामे तत्काळ करा

संयुक्त पंचनामे कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणांनी करावे. त्याचा अहवाल शासनास सादर करावा. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी केटीवेअर बंधाऱ्यांचे दरवाजे वाहून गेले आहेत ते दुरुस्त करावे. तसेच पाझर तलावांची दुरुस्ती, पिकांच्या नुकसानीचे, पडझड झालेल्या घरांचे व इतर नुकसानीचे पंचनामे तत्काळ करून जिल्हास्तरावर पाठवावे. अतिवृष्टीने बाधित शेतकऱ्यांना मुदतीच्या अनुषंगाने प्रस्ताव सादर करावे. - अब्दुल सत्तार, पालकमंत्री

टॅग्स :शेती क्षेत्रहवामानपाणीपाणीकपातपाऊसजायकवाडी धरण