Lokmat Agro >हवामान > Jayakwadi Dam Water Level : गोदावरी, प्रवरेतून जायकवाडीसाठी वाहिले १०३ टीएमसी पाणी

Jayakwadi Dam Water Level : गोदावरी, प्रवरेतून जायकवाडीसाठी वाहिले १०३ टीएमसी पाणी

Jayakwadi Dam Water Level: 103 TMC water released to Jayakwadi from Godavari, Pravara | Jayakwadi Dam Water Level : गोदावरी, प्रवरेतून जायकवाडीसाठी वाहिले १०३ टीएमसी पाणी

Jayakwadi Dam Water Level : गोदावरी, प्रवरेतून जायकवाडीसाठी वाहिले १०३ टीएमसी पाणी

नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे.

नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

रमेश शिंदे
नाशिक, अहिल्यानगर जिल्ह्यांतील प्रमुख नद्या असलेल्या गोदावरी आणि प्रवरा नदीपात्रातून गेल्यावर्षीपेक्षा यंदा जायकवाडी जलाशयासाठी विक्रमी पाणी वाहिले. जायकवाडीच्या पाणी साठवण क्षमतेइतके म्हणजेच १०३ टीएमसी पाणी वाहिले आहे.

जायकवाडी जलाशय शंभर टक्के भरल्याने यंदा अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्यांना समन्यायी पाणी वाटप कायदा लागू करण्याची गरजच भासणार नाही. दोन्ही जिल्ह्यांतील धरण व लाभक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने पाणीटंचाई जाणवणार नसल्याचे चित्र आहे.

जायकवाडी जलाशय भरण्यासाठी गोदावरी आणि प्रवरा या नद्या महत्त्वाच्या मानल्या जातात. जायकवाडी जलाशय पूर्ण भरावा, अशी इच्छा अहिल्यानगर व नाशिक जिल्ह्यांतील शेतकरी दरवर्षी करताना दिसतात. 

प्रसंगी पावसाचे प्रमाण कमी राहिल्यास समन्यायी पाणी वाटप धोरणावरून मराठवाडा विरुद्ध अहिल्यानगर, नाशिक असा संघर्ष बघायला मिळतो. मात्र, यंदा अशी वेळ येणार नसल्याने दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आनंदात असल्याचे चित्र आहे.

गेल्यावर्षी या नद्यांमधून कमी पाणी वाहिल्याने समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा, मुळा, निळवंडे तसेच नाशिक जिल्ह्यातील दारणा, गंगापूर, पालखेड धरणांतून जायकवाडीसाठी पाणी सोडावे लागले होते.

त्यावेळी मराठवाडा विरुद्ध अहिल्यानगर-नाशिक संघर्ष पाहायला मिळाला होता. पाणी सोडल्याने त्याचा रब्बी हंगामावरही परिणाम झाला होता. यंदा मात्र ही वेळ येणार नसल्याने शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागले आहेत.

यंदा गोदावरी आणि प्रवरा या दोन्ही नद्यांमधून तब्बल १०३ टीएमसी इतके पाणी जायकवाडीत दाखल झाले. त्यात गोदावरीतून ७० तर प्रवरेतून ३३ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे आहे.

गेल्यावर्षी गोदावरीतून १३ तर प्रवरेतून अवघे १ टीएमसी पाणी जायकवाडीसाठी वाहिले होते. यंदा दोन्ही जिल्ह्यांतील धरणांतून गेल्या तीन महिन्यांपासून नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात येत होता. यंदाचा पाऊस हंगाम संपल्याने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात हा विसर्ग आता पूर्णतः थांबला आहे.

बुधवारच्या (दि. ६) जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत गोदावरी नदीवरील कमलपूर (श्रीरामपूर) येथील बंधाऱ्यातून ६९ हजार ९६१ दलघफू पाणी तर तिची उपनदी असलेल्या प्रवरेच्या मधमेश्वर (ता. नेवासा) येथील बंधाऱ्यातून ३२ हजार ९२८ दलघफू पाणी जायकवाडीच्या दिशेने झेपावल्याची नोंद आहे.

यंदा दोन्ही नद्यांमधून जायकवाडी जलाशयात ११० टीएमसी इतकी पाण्याची आवक झाल्याने जायकवाडी जलाशयातूनही तब्बल ३० टीएमसी पाणी सोडण्यात आले. 

आतापर्यंत दोन्ही नद्यांतून तब्बल १०३ टीएमसी पाणी जायकवाडीच्या दिशेने वाहिले असून, हे पाणी नाथसागर जलाशयाच्या एकूण क्षमतेएवढे आहे. १ जूनपासून ते बुधवारपर्यंत (दि.६) भंडारदरा धरणात २३१४४, निळवंडे धरणात २३१०४, मुळा धरणात ३२८९४ दलघफू पाण्याची आवक झाल्याची नोंद आहे.

२०२२ चा विक्रम अजूनही अबाधितच
२०२२ साली पावसाळी हंगामात गोदावरीतून १३३ तर प्रवरेतून ८० टीएमसी पाणी असे विक्रमी तब्बल २१३ टीएमसीहून अधिक पाणी जायकवाडीत वाहून गेल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली होती. आजही हा विक्रम अबाधितच आहे.

ऊस, कांदा, गहू पिकाकडे कल
जायकवाडी भरल्याने समन्यायी पाणी वाटपाचे संकट टळले आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यांतील धरणांचे लाभक्षेत्र तसेच गोदावरी, प्रवरा आणि मुळा नद्यांवरील बंधारेही पूर्ण क्षमतेने भरले आहेत. त्यामुळे ऊस, कांदा, गहू या पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढेल.

Web Title: Jayakwadi Dam Water Level: 103 TMC water released to Jayakwadi from Godavari, Pravara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.