Lokmat Agro >हवामान > Jayakwadi Dam Water Level : गोदावरीचा विसर्ग ७० हजारांवरून दीड हजारांवर जायकवाडी किती भरलं?

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीचा विसर्ग ७० हजारांवरून दीड हजारांवर जायकवाडी किती भरलं?

Jayakwadi Dam Water Level: Godavari discharge decrease from 70 thousand to 1.5 thousand How much fill Jayakwadi Dam? | Jayakwadi Dam Water Level : गोदावरीचा विसर्ग ७० हजारांवरून दीड हजारांवर जायकवाडी किती भरलं?

Jayakwadi Dam Water Level : गोदावरीचा विसर्ग ७० हजारांवरून दीड हजारांवर जायकवाडी किती भरलं?

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. धरणांत पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आले.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. धरणांत पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आले.

शेअर :

Join us
Join usNext

कोपरगाव : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. धरणांत पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आले.

२६ ऑगस्टला ७० हजार क्यूसेकने प्रवाही असलेल्या गोदावरी नदीत दहा दिवसांत पाण्याच्या विसर्ग कमी-कमी होत ५ सप्टेंबरला केवळ दीड हजार क्युसेकवर आला आहे.

दुथडी भरून वाहणाऱ्या गोदावरी नदीचे सौंदर्य गेला आठवड्यात कोपरगावकरांना पहावयास मिळाले. यंदाच्या पावसाळ्यात दुसन्यांदा गोदावरी नदी दुथडी भरून वाहिली.

ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सर्वत्र जोरदार पाऊस झाला. याला नाशिक जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रही अपवाद नव्हते. दारणा, गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आले. नांदुर-मध्यमेश्वर धरणातून पाणी गोदापात्रात विसर्ग वाढविण्यात आला.

२६ ऑगस्टला ७० हजार क्यूसेक पाण्याने गोदावरी नदी प्रवाही झाली. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने कोपरगाव शहरातील घाटावर पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत होती.

दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ ऑगस्टला सकाळी ६० हजार दुपारी ५४ हजार तर सायंकाळी ३९ हजार क्युसेकने पाणी कमी कमी होत गेले. २८ तारखेला २७ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग होत होता.

त्यानंतर २९ तारखेला १६ हजार, ३० तारखेला ११ हजार, दि. ३१ रोजी ५ हजार, दि. १ ते ४ सप्टेंबर दरम्यान ३ हजार १५५ क्युसेकने विसर्ग कायम राहिला.

गुरुवार दि. ५ रोजी पाण्याचा विसर्ग केवळ दीड हजारावर झाला. त्यामुळे गोदापात्रात नगन्य पाणी आहे. मात्र गोदावरी डावा व उजवा कालवा प्रवाही असल्याने शेतकरी समाधानी आहेत.

जायकवाडीचा पाणीसाठा ९० टक्के
-
जायकवाडीचा साठा आणि आनंद कोपरगाव व राहात्याला जायकवाडी धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांवर गेल्याचा आनंद मराठवाड्याप्रमाणे कोपरगाव व राहाता तालुक्यातील नागरिकांना सुद्धा आला आहे.
त्याला कारणही तसेच आहे. जायकवाडी धरण रिकामे राहिल्यास नगर, नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडावे लागते.
त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी शेती सिंचनाचा प्रश्न निर्माण होतो.
- आता ९० टक्के पाणीसाठा जायकवाडीचा झाल्याने कोपरगावकरांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

Web Title: Jayakwadi Dam Water Level: Godavari discharge decrease from 70 thousand to 1.5 thousand How much fill Jayakwadi Dam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.