Join us

Jayakwadi Dam Water Level : मुळा, सीना धरणातून मोठा विसर्ग जायकवाडीत आलं किती पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2024 9:01 AM

नाशिक जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे.

कोपरगाव : नाशिक जिल्ह्यासह कोपरगाव परिसरात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून शनिवारी रात्री ९ वाजता ३० हजार क्यूसेक विसर्ग होता. मध्यरात्री तो वाढविण्यात आला.

रविवारी सकाळी सहा वाजता तो ३९ हजार करण्यात आला. त्यानंतर ८ वाजता ५२ हजार ३०८ क्यूसेक करण्यात आला आहे. त्यामुळे गोदावरी नदी दुथडी भरून प्रवाही झाली आहे.

कोपरगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसास सुरुवात झाली, रविवारी दिवसा काहीशी विश्रांती पावसाने घेतली. मात्र नाशिक जिल्ह्यातील पानलोट क्षेत्रात पाऊस होत होता. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

गंगापूर धरणातून ८ हजार ४२८ क्यूसेकने विसर्ग होत होता, दारणा धरणातून तेरा हजार क्यूसेकने तर भावली-७०१, भाम-२ हजार ९९०, गौतमी-१,५३६, वालदेवी १०७ आणि कडवा धरणातून ५ हजार ६२६ क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे.

हे सर्व पाणी नांदूरमधमेश्वर धरणात येत असून, भावली-७०१, भाम-२ हजार ९९०, गौतमी-१,५३६, वालदेवी १०७ आणि कडवा धरणातून ५ हजार ६२६ क्यूसेक विसर्ग करण्यात येत आहे. हे सर्व पाणी नांदूरमधमेश्वर धरणात येत असून, तेथून पाण्याचा विसर्ग गोदावरी नदी पात्रात ५२ हजार ३०८ क्यूसेकने होत आहे. त्यामुळे कोपरगाव येथील गोदावरी नदीपात्र दुथडी भरून वाहत आहे.

भोसा खिंडीतून येणारे कुकडीचे पाणी, आठवडाभरापासून पाणलोट क्षेत्रासह नगर शहर, परिसरात पडणाऱ्या पावसामुळे कर्जत तालुक्यातील सीना धरणात मोठी पाणी आवक झाली. यामुळे सीना धरणाचा पाणीसाठा ६७.२६ टक्क्यांवर गेला आहे. उपसा सिंचन योजनेद्वारे सीना धरणातून मेहकरी तलावात पाणी सोडण्यास सुरुवात झाली.

जायकवाडीत ३० टीएमसी पाणी पोहोचलेपैठण येथील नाथसागर जलाशयात ४० टक्के पाणीसाठा झाला आहे. जायकवाडीत सध्या २९ हजार ५१८ क्युसेकने आवक सुरू असून जूनपासून एकूण ३० टीएमसी पाणी अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातून जायकवाडीत पोहोचले आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणधरणपाणीपाऊसनाशिकगंगापूर धरणनदीपूर