Join us

Jayakwadi Dam Water Release Update : जायकवाडी भरले; १२ दरवाजे उघडून ६ हजार ८८८ क्युसेकने विसर्ग सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2024 9:29 AM

मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांची आणि गावांची तहान हे धरण भागविते. तसेच, मराठवाड्यातील लाखो एकर शेतीसाठी हे धरण वरदान ठरलेले आहे. धरण भरल्यामुळे या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. यंदा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या धरणात अत्यल्प पाणीसाठा होता. पण, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर धरणात पाण्याची आवक वाढली.

धरणाचे ६ दरवाजे सोमवारी दुपारी १२:३० आणि सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास आणखी ६ दरवाजे उघडण्यात आले असून, त्यामधून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणात गेल्या काही दिवसांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू आहे.

सोमवारी जायकवाडी धरणात वरच्या धरणातून १० हजार ७४६ क्युसेकने पाण्याची आवक सुरू आहे. धरणातील पाणीसाठा दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ९७.६९ टक्क्यांवर पोहोचल्यानंतर प्रशासनाच्या वतीने गोदापात्रात पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेण्यात आला.

अधीक्षक अभियंता समाधान सब्बीनवार, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपविभागीय अभियंता दिगंबर रायबोले, पोलिस निरीक्षक संजय देशमुख, नामदेव खराद, शाखा अभियंता विजय काकडे, गणेश खरडकर, गणेश वाघमोडे यांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून धरणाचे गेट क्रमांक १०, २७, १८, १९, १६ व २१ असे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून ३ हजार १४४ क्युसेकने गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

धरणात आवक वाढल्याने सायंकाळी ७ वाजता धरणाचे १४, २३, १२, २५, ११ व २६ असे आणखी ६ असे एकूण १२ दरवाजे उघडून नदीपात्रातून एकूण ६ हजार ८८८ क्युसेकने पाण्याचा गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला.

धरणाच्या खालील ६ बंधारे भरले

१५२१.५८ - फूट धरणाची पाणी पातळी आहे.२८५०.८८८ - दलघमी पाणीसाठा आहे,६०० - क्युसेकने उजव्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे.१८ - बंधारे गोदावरी नदीवर पैठण ते नांदेड दरम्यान आहेत. यापैकी०६ - बंधारे भरले असल्यामुळे या बंधाऱ्यांद्वारे हे पाणी सरळ नांदेडकडे निघाले आहे.१०,७४६ - क्युसेकने धरणातून पाण्याची आवक

गेल्या ४८ वर्षात केवळ १४ भरले जायकवाडी   

१९७६ पासून आतापर्यंत जायकवाडी धरण १४ वेळेस शंभर टक्के भरले आहे.

टॅग्स :जायकवाडी धरणमराठवाडानांदेडनांदेडगोदावरीजलवाहतूकपाऊसहवामाननाशिक