Lokmat Agro >हवामान > Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाणीसाठा ४.५ टीएमसीवर! , मागील वर्षाच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची तूट

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाणीसाठा ४.५ टीएमसीवर! , मागील वर्षाच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची तूट

Jayakwadi Dam: Water storage in Jayakwadi Dam at 4.5 TMC! , a deficit of 38.06 percent over the previous year | Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाणीसाठा ४.५ टीएमसीवर! , मागील वर्षाच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची तूट

Jayakwadi Dam: जायकवाडी धरणात पाणीसाठा ४.५ टीएमसीवर! , मागील वर्षाच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची तूट

पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत.

पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

मराठवाड्यात मागील वर्षी याच दिवशी ४०.४६ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला होता. यंदा सरासरी पाणीसाठा ९.९४ टक्क्यांवर पाेहोचला आहे. दरम्यान, जायकवाडी धरणात ५.९५ टक्के पाणीसाठा उरला आहे. मागील वर्षी हा पाणीसाठा ४४.०१ टक्के एवढा होता. गतवर्षीच्या तुलनेत ३८.०६ टक्क्यांची जलतूट आहे.

राज्यात बीड, धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली, लातूर जिल्ह्यातील नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे. पिण्याच्या पाण्याचा खंड वाढू लागला असून वाडी वस्त्यांमध्ये टँकर वाढले आहेत.

मागील वर्षात मराठवाड्यात सरासरीहून कमी पाऊस झाल्याने धरणांमध्ये पुरेसे पाणी शिल्लक राहिले नाही. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आता पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत.

किती टीएमसी पाणी उरलंय?

जायकवाडी धरणाची क्षमता २९०९.०४ दलघमी एवढी असून मराठवाड्यातील हे सर्वात अधिक जलक्षमतेचे धरण आहे. आज जायकवाडीमध्ये १२९.१९ दलघमी म्हणजेच केवळ ४.५ टीएमसी पाणी शिल्लक राहिले आहे.

Web Title: Jayakwadi Dam: Water storage in Jayakwadi Dam at 4.5 TMC! , a deficit of 38.06 percent over the previous year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.