Join us

जायकवाडी धरणाची होणार दुरुस्ती, ड्रीप योजनेंतर्गत ८५ कोटी...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2023 3:24 PM

केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी डॅम रिहॅबिटेशन अँड इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम (ड्रीप) योजनेंतर्गत मंजूर केलेल्या ८५ कोटी रुपयांतून जायकवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी ...

केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी डॅम रिहॅबिटेशन अँड इम्प्रूव्हमेंट प्रोग्रॅम (ड्रीप) योजनेंतर्गत मंजूर केलेल्या ८५ कोटी रुपयांतून जायकवाडी धरणाच्या दुरुस्तीसाठी निविदा प्रक्रिया लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने (कडा) नुकतीच राबविली. १५ दिवसांत जायकवाडीच्या दुरुस्तीला सुरुवात होणार आहे.

जायकवाडी धरण बांधल्यापासून आजपर्यंत विशेष अशी दुरुस्ती केली नव्हती. जागतिक बँक प्रकल्पातून ४० वर्षांहून जुन्या धरणांच्या दुरुस्तीसाठी ड्रीप योजनेंतर्गत निधी देण्यात येतो. या योजनेतून जायकवाडीच्या दुरुस्तीसाठी केंद्र सरकारने दोन वर्षांपूर्वी ८५ कोटी रुपये मंजूर केले. देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाने हा निधी खर्च केला नसल्याचे वृत्त 'लोकमत'ने मार्च महिन्यात प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत कडा कार्यालयाने याबाबतच्या प्रस्तावाचा पाठपुरावा वरिष्ठ कार्यालयाकडे करीत निविदा प्रक्रियेस मंजुरी मिळविली. गत महिन्यात ६८ कोटी आणि १७ कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या निविदा काढून ठेकेदार निश्चित केला. आता अवघ्या काही दिवसांत संबंधित ठेकेदारांना कामाचे कार्यारंभ आदेश देण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत कामाला सुरुवात होणार आहे. ६८ कोटी रुपयांतून धरणाच्या भिंतीची दुरुस्ती करणे, धरणावरील रस्त्याचे मजबुतीकरण करणे, पिचिंग करणे, गेस्ट हाऊसची दुरुस्ती, इलेक्ट्रिकलची कामे केली जाणार आहेत. 

ड्रीप योजनेंतर्गत जायकवाडीच्या दुरुस्तीसाठी ८५ कोटी रुपये मंजूर आहेत. या निधीतून ६८ कोटी रुपये आणि १७ कोटी रुपयांची अशी दोन वेगवेगळ्या निविदा काढून ठेकेदार निश्चित करण्यात आले. तांत्रिक कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर पंधरा दिवसांतच कामाला सुरुवात होईल. -एस. के. सब्बिनवार, अधीक्षक अभियंता, कडा

टॅग्स :जायकवाडी धरणधरण