Join us

Jayakwadi Water Storage अखेर जायकवाडीची पाणीपातळी दीड फुटाने वाढली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2024 9:04 AM

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणी जायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली आहे.

नांदूर मधमेश्वरमधून सोडलेले पाणीजायकवाडी धरणात  शुक्रवारपासून येण्यास सुरुवात झाली असून, शनिवारी सायंकाळी ६ वाजता १० हजार २६० क्युसेसने पाणी धरणात येत आहे. त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत दोन दिवसांत दीड टक्क्याने वाढ झाली असून, सध्या पाणी पातळी ५.७९ टक्क्यांवर पोहोचली आहे, अशी माहिती धरण शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली.

मागील तीन ते चार दिवसांपासून जायकवाडी पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्यामुळे गुरुवारी नांदुर मधमेश्वरमधून जायकवाडी धरणाकडे १२ हजार क्युसेकने पाणी गोदावरी नदी पात्रात सोडण्यात आले होते. हे पाणी शुक्रवारी रोजी सायंकाळी सहा वाजता जायकवाडीत पोहोचले.

शनिवारपर्यंत धरणातील पाणी पातळी दीड फुटाणे वाढली असून, ती आता ५.७९ टक्के झाली आहे. १ जूनपासून ते आजपर्यंत धरणात ८२.२९२० दलघमी पाण्याची आवक झाली आहे.

मराठवाड्यातील प्रमुख धरणांतील जलसाठा

जायकवाडी११३.२१
निम्न दुधना१९.१०
येलदरी२४७.९४
सिद्धेश्वर१३.६५
मांजरा१.३७
पैनगंगा४०५.४९
मानार५६.७४
निम्न तेरणा२५.१८
विष्णूपुरी६८.३६
 (सर्व आकडे दलघमीत)

हेही वाचा - Rain Alert तुम्हाला माहिती आहे का पावसाचा रेड, ऑरेंज, ग्रीन, यलो अलर्ट म्हणजे काय? मग हे वाचाचं

टॅग्स :जलवाहतूकजायकवाडी धरणगोदावरीनदीमराठवाडानांदेडजालनापाणीपाऊसहवामानमोसमी पाऊसनांदूरमधमेश्वर