Lokmat Agro >हवामान > Katepurna Dam : जलसंपदा विभागाने केले नियोजन ; १२ नोव्हेंबरपासून मिळणार पाणी

Katepurna Dam : जलसंपदा विभागाने केले नियोजन ; १२ नोव्हेंबरपासून मिळणार पाणी

Katepurna Dam : Planning done by Water Resources Department; Water will be available from November 12 | Katepurna Dam : जलसंपदा विभागाने केले नियोजन ; १२ नोव्हेंबरपासून मिळणार पाणी

Katepurna Dam : जलसंपदा विभागाने केले नियोजन ; १२ नोव्हेंबरपासून मिळणार पाणी

काटेपूर्णा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १२ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. (Katepurna Dam)

काटेपूर्णा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १२ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. (Katepurna Dam)

शेअर :

Join us
Join usNext

Katepurna Dam :

अकोला : काटेपूर्णा धरणाच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना १२ नोव्हेंबरपासून रब्बी हंगामाला सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे.
यासाठीचे नियोजन पाटबंधारे विभागाने केले आहे.

रब्बी हंगाम सन २०२४-२५ च्या कालवा आर्वतनाबाबत पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष व पदाधिकारी यांच्याशी ३ नोव्हेंबर रोजी पाण्याच्या आर्वतनावर चर्चा होती.

यानुसार काटेपूर्णा प्रकल्पाच्या मुख्य कालव्याद्वारे १२ नोव्हेंबरपासून जलसंपदा विभागाने रब्बी आर्वतने सुरू करण्याचे नियोजित आहे.
सदर आर्वतने ३१ मार्च २०२५ पर्यंत राहतील.

नियोजित पाणी पुरवठ्याव्यतिरिक्त अतिरिक्त पाणी पुरवठा करण्यास पाटबंधारे विभाग जबादार नसेल असे म्हटले आहे. प्रत्येक लाभधारक शेतकऱ्याने व पाणी वापर संस्थेने पाटबंधारे विभागास पाणी मागणी अर्ज करणे अनिवार्य राहणार आहे.

रब्बी हंगामातील नियोजित कालवा आवर्तन

कालवा क्रमांक १ मधून १२ नोव्हेंबर ते ७ डिसेंबरपर्यंत २५ दिवस, क्रमांक दोनमधून १३ ते २८ डिसेंबर १५ दिवस, कालवा क्रमांक ३ मधून ५ जानेवारी ते २० जानेवारी १५ दिवस, कालवा क्रमांक चारमधून २५ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत २० दिवस तसेच पाचव्या कालव्यातून २० फेब्रुवारी ते ५ मार्च असे १५ दिवस तसेच सहाव्या क्रमांकाच्या कालव्यातून १२ ते ३१ मार्च २०२५ असे २० दिवस धरणातून पाण्याचे आवर्तन केले जाणार आहे.

रब्बी हंगामासाठी काटेपूर्णा धरणाच्या लाभक्षेत्रातून पाणी सोडण्यात येणार आहे या अनुषंगाने शेतकरी व पाणी वापर संस्थेने पाटबंधारे विभागाकडे पाण्याची मागणी अर्ज करणे अनिवार्य आहे. - अमोल वसूलकर, कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग

Web Title: Katepurna Dam : Planning done by Water Resources Department; Water will be available from November 12

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.