Lokmat Agro >हवामान > Katepurna Dam water: काटेपूर्णा धरणात केवळ 'इतके' टक्केच जलसाठा; पण जपूनच वापरा वाचा सविस्तर

Katepurna Dam water: काटेपूर्णा धरणात केवळ 'इतके' टक्केच जलसाठा; पण जपूनच वापरा वाचा सविस्तर

Katepurna Dam water: latest news Only 'so' percent water storage in Katepurna Dam; But use it carefully Read in detail | Katepurna Dam water: काटेपूर्णा धरणात केवळ 'इतके' टक्केच जलसाठा; पण जपूनच वापरा वाचा सविस्तर

Katepurna Dam water: काटेपूर्णा धरणात केवळ 'इतके' टक्केच जलसाठा; पण जपूनच वापरा वाचा सविस्तर

Katepurna Dam water: अकोल्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ काही टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam)

Katepurna Dam water: अकोल्याची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या काटेपूर्णा धरणात आता केवळ काही टक्केच जलसाठा शिल्लक आहे. सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने घट होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam)

शेअर :

Join us
Join usNext

Katepurna Dam water : अकोल्याची लाईफलाईन म्हणून काटेपूर्णा धरणात आता २६ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पांतील पाणी पातळीत वेगाने कमी होत आहे. त्यामुळे पाण्याचा जरा जपूनच वापर करा, असे प्रशासनाने कळविले आहे. (Katepurna Dam)

अकोला जिल्ह्याच्या कमाल तापमानात वाढ झाली असून, यामुळे बाष्पीभवन १६ मिमीपर्यंत वाढले आहे. अकोला शहराची लाईफलाईन काटेपूर्णा धरणात आता २६ टक्के जलसाठा शिल्लक आहे. (Katepurna Dam)

जिल्ह्यातील मोठ्या दोन प्रकल्पांत ३५ टक्के, ४ मध्यम प्रकल्पात २९ टक्के तर २४ लघु प्रकल्पांत २६ टक्के एवढा जलसाठा शिल्लक आहे. कमाल तापमानातही वाढ झाल्याने बाष्पीभवन वाढले आहे. परिणामी जलसाठ्यात घट होत असल्याने जिल्ह्यातील या सर्व सिंचन प्रकल्पांतील पाणीपातळी वेगाने कमी होत आहे. (Katepurna Dam)

अकोला शहराला पाणीपुरवठा होत असलेल्या काटेपूर्णा धरणाची जलपातळी २६ टक्क्यांवर आली असून, तेल्हारा तालुक्यातील वाण धरणाची पातळी ३८ टक्के एवढी आहे. (Katepurna Dam)

खारपाणपट्टयातील गावांमध्ये पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. महिला, पुरुष व बालकांना दूरवर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाने पाणीटंचाईच्या उपाययोजनाची यादी तयार करून कामाचे आदेश दिले आहेत; परंतु या कामाला विलंब होत आहे. (Katepurna Dam)

उपाययोजना करा

* उपाययोजनांची कामे अद्याप पूर्ण झाली नसल्याने गावकऱ्यांचे पाण्याविना हाल होत आहेत. अनेक भागांत हापश्या बंद पडल्या आहेत.

* नळ योजनेचे काम अपुरे आहे, यामुळे प्रशासनाने तत्काळ उपाययोजनांची कामे करून नागरिकांना दिलासा देण्याची गरज आहे, अशा प्रतिक्रिया ग्रामस्थांतून उमटत आहेत.

पाणी जपून वापरा

* धरणातील पाण्याचा साठा कमी होत असल्याने प्रत्येकाने पाणी जपून वापरावे, पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन जिल्हा, महापालिका व जलसंपदा विभागाने केले आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jivant Sat-Bara : 'जिवंत सात-बारा मोहीमे'तून शेतकरी होणार जमिनीचे मालक; जाणून घ्या सविस्तर

Web Title: Katepurna Dam water: latest news Only 'so' percent water storage in Katepurna Dam; But use it carefully Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.