Lokmat Agro >हवामान > Khadakwasla Dam : काय सांगताय या धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त

Khadakwasla Dam : काय सांगताय या धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त

Khadakwasla Dam : What is said, the discharge of water is more than the capacity of this dam | Khadakwasla Dam : काय सांगताय या धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त

Khadakwasla Dam : काय सांगताय या धरणाच्या क्षमतेपेक्षा पाण्याचा विसर्ग जास्त

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरण भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत आतापर्यंत २९.९८ टीएमसी पाणी सोडले आहे.

पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही धरण भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत आतापर्यंत २९.९८ टीएमसी पाणी सोडले आहे.

शेअर :

Join us
Join usNext

पुणे : पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासलाधरण साखळी प्रकल्पातील चारही धरण भरली आहेत. त्यामुळे या धरणातून मुठा नदीत आतापर्यंत २९.९८ टीएमसी पाणी सोडले आहे.

खडकवासला धरण साखळीत आता २८.८४ टीएमसी म्हणजे ९८.९२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पेक्षा जास्त पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

राज्यात जून महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र, जुलै महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांत पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात पाऊस जोरदार बरसला होता.

नदीपात्रात पाणी सोडले
■ खडकवासला धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही धरणे भरली आहेत. धरणे भरली असल्यामुळे नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहेत.
■ आतापर्यंत मुठा नदीत २९.९८ टीएमसी पाणी सोडण्यात आले आहे. खडकवासला धरण साखळीत आता २८. ८४ टीएमसी म्हणजे ९८.९२ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यापेक्षा जास्त पाणी नदीत सोडण्यात आले आहे.

रण टीएमसीटक्के
खडकवासला१.७२८७.००
पानशेत१०.६५१००
वरसगाव१२.७६९९.५४
टेमघर३.७११००
एकूण२८.८४९८.९२

Web Title: Khadakwasla Dam : What is said, the discharge of water is more than the capacity of this dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.