सध्या अरबी समुद्रात तयार झालेल्या 'तेज' चक्रीवादळाचा महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचा धोका नाही. 'तेज' चक्रीवादळ हे मुंबई पासून सुमारे दोन हजार किलोमीटर म्हणजे मुंबई ते पुणे अंतराच्या दहापट जास्त अंतरावर आहे. इतक्या दूर अंतरावरून तेज चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर पडणारा प्रभाव म्हणजे 'बिरबल की खिचडी पकाना' असेच म्हटले पाहिजे. 'तेज' चक्रीवादळ सध्या ९० ते १०० किमी प्रतितास वेगाने पुढे-पुढे किंवा दूर जात आहे. दक्षिण ओमान आणि यमन किनाऱ्यावर 'लॅंडफॉल' झाल्यानंतर २५ ऑक्टोबर २०२३ नंतर 'तेज' चक्रीवादळ नष्ट होईल.
अर्थव्यवस्थेचे नुकसान नको!'तेज' चक्रीवादळाचा महाराष्ट्राला व इतर राज्यांना देखील कुठलाही धोका नाही. आंधप्रदेश आणि तामिळनाडूमधील किनारपट्टीवर नाहक सावधानतेचा इशारा देत मच्छीमारांना मासेमारी करण्यासाठी समुद्रात जाण्यास रोखले जाते आहे. त्यामुळे अफवा व खोट्या हवामान विषयी बातम्या पेरत कोकण किनारपट्टीवरील तसेच इतर राज्यांच्या मच्छीमारांना उगीचच भीती घालून त्यांना मच्छीमारीपासून रोखत स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक नुकसान तसेच राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचे देखील नुकसान करू नये.
चक्रीवादळाचा पॅटर्न बदलला!गेल्या दहा वर्षांत (२०१० ते २०१९) अरबी समुद्रात १७ वादळे येऊन धडकली. तर गेल्या पाच (२०१५ ते २०१९) वर्षांत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरामध्ये चक्रीवादळाची निर्मिती होण्याचे प्रमाण ३२ टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या दहा वर्षांत वादळांच्या संख्येतील ही वाढ त्यापूर्वीच्या दशकातील वादळापेक्षा अकरा टक्क्यांनी जास्त आहे. चक्रीवादळांच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की, १८९१-२००० सालाच्या कालावधीत जवळपास ३०८ उष्णकटिबंधीय चक्रीवादळांनी पूर्व किनारपट्टी ओलांडली. त्यातील १०३ तीव्र होती. पश्चिम किनारपट्टी ओलांडलेल्या ४८ चक्रीवादळांपैकी २४ चक्रीवादळे तीव्र होती. एप्रिल ते मे आणि ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात निर्माण होत असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर चक्रीवादळात होण्याचे प्रमाण ८० टक्के झाले आहे.
किनारपट्टीवरील चक्रीवादळाच्या वारंवारतेच्या विश्लेषणावरून, १८९१ ते १९९० च्या दरम्यान ३३ चक्रीवादळे भारताच्या पूर्वेकडील आणि २६२ चक्रीवादळे पश्चिम किनारपट्टीवर बनलीत असे दिसून आले आहे. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त चक्रीवादळ येतात. तसेच बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळ यांतील गुणोत्तर ४ : १ असे आहे. मात्र हे प्रमाण देखील आशियाई प्रदेशात बदलत आहे असे निष्कर्ष मला संशोधनात मिळाले आहेत, जे प्रकाशित केले आहेत. पॅटर्न बदलल्याने अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढते आहे. गेल्या ३० वर्षात केवळ संख्या तर वाढलीच आहे पण त्याबरोबरच उष्णदेशीय चक्रीवादळांची तीव्रता देखील वाढत चालली आहे.
किकुलॉजीचे हेही भाग वाचा
- किकुलॉजी : 'विषुवदिनानिमित्त समजून घेऊ शेती आणि प्रकाशाचे महत्त्व
- किकुलॉजी : हवामान सजग व्हायचेय, तर ओझोनच्या अद्भुत इलेक्ट्रॉनिक संरचनेची माहिती हवीच
किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या
किकुलॉजी : 'चांद्रयान ३' मोहीम, बदलणारे हवामान आणि चंद्रावरच्या शेतीची गरज
किकुलॉजी- इलेक्ट्रॉन देतो हवामान अलर्ट, वीज ठरवते पीकांची वाढ
पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?
अचूक हवामान माहितीसाठी माठ आहेत हवामान शास्त्रज्ञ!
किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार?
किकुलॉजी : 'जेट स्ट्रिम'मुळे भाजून निघतेय अमेरिका, चीन आणि युरोप!
किकुलॉजी : महाराष्ट्रासह उत्तर भारतावर 'भूकंपाचे ढग आणि धुके’
किकुलॉजी : अद्ययावत इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानाने शेती अर्थव्यवस्थेची भरभराट
किनारपट्टीवरील चक्रीवादळाच्या वारंवारतेच्या विश्लेषणावरून, १८९१ ते १९९० च्या दरम्यान ३३ चक्रीवादळे भारताच्या पूर्वेकडील आणि २६२ चक्रीवादळे पश्चिम किनारपट्टीवर बनलीत असे दिसून आले आहे. अरबी समुद्रापेक्षा बंगालच्या उपसागरात जास्त चक्रीवादळ येतात. तसेच बंगालच्या उपसागरात तयार होणारे चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात तयार होणारे चक्रीवादळ यांतील गुणोत्तर ४ : १ असे आहे. मात्र हे प्रमाण देखील आशियाई प्रदेशात बदलत आहे संशोधनात लेखकाला असेही दिसून आले आहे. पॅटर्न बदलल्याने अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या चक्रीवादळांची संख्या वाढते आहे. गेल्या ३० वर्षात केवळ संख्या तर वाढलीच आहे पण त्याबरोबरच उष्णदेशीय चक्रीवादळांची तीव्रता देखील वाढत चालली आहे.
चक्रीवादळांचा पॅटर्न मान्सून पॅटर्न बरोबरच बदलला आहे हे सत्य जितके लवकर आपण स्वीकारू तितके लवकर आर्थिक नुकसान टाळत सुयोग्य शेती आणि अन्नसुरक्षा लक्ष्य आपण गाठू शकतो. एकाचवेळी महाराष्ट्रातील ४३ हजार ७२२ गावांमध्ये सर्वत्र येत्या पंधरा दिवसांत प्रचंड किंवा मुसळधार पावसाची कुठलीही शक्यता नाही हे नियोजन करताना आपल्याला लक्षात घ्यायला हवे. मात्र ऊन वाढत बाष्पीभवन आणि स्थानिक वातावरणातील अस्थिरतेमुळे काही गावांत विजांचा कडकडाट आणि लखलखाट होत क्युम्युलोनिंबस ढगांच्या निर्मितीतून जास्तीत जास्त अर्धा ते एक तास पाऊस होऊ शकतो हे लक्षात घेत स्वानुभवाने शेती नियोजन शेतकरी नक्कीच करू शकतो.
प्रा. किरणकुमार जोहरेआंतरराष्ट्रीय ढगफुटी तज्ज्ञ व हवामान संशोधक मो. नं. 9168981939, 9970368009kirankumarjohare2022@gmail.com