उत्तर भारतासह महाराष्ट्रावर भूकंप ढगांची व धुक्याची निर्मिती होत असून येत्या काळात हिमालयाच्या पायथ्याशी, अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ आदी प्रदेश तसेच उत्तर भारतात जनतेला भूकंपाचा सामना करावा लागणार आहे. तेव्हा घाबरून न जाता व अफवा न पसरवता सावधतेने तयार रहाणे आवश्यक आहे.
तापमान चढ उतार आणि जमिनीखाली टॅक्टॉनिक प्लेट्सच्या गतिशीलतेने बाष्प वाढते आहे. परिणामी धुके आणि विविध प्रकारच्या भुकंप ढगांची निर्मिती होत आहे. सध्या महाराष्ट्रात तसेच उत्तर भारतात देखील भूकंप ढगांची आणि धुक्याची निर्मिती होत आहे. येत्या काळात ४ ते ८ रिश्टर स्केल भूकंपाचा सामना भारताला करावा लागणार आहे. त्यामुळे प्रशासनासह समन्वयाने एकजुटीने 'टिमवर्क'साठी आपत्कालीन व्यवस्था, नागरी संरक्षण दल, एनएसएस, एनसीसी पथकं आदींनी देखील तयार राहणे आवश्यक आहे. अनेकदा भूकंपाचे एकामागून एक अशी मालिका होते. यामुळे सावधान व सतर्क राहणे अत्यंत गरजेचे आहे.
स्वतः बनविलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा हिमालयात चार वेळा जाऊन कॅलीब्रेट करुन, तसेच वापर करीत असलेल्या आपल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या मदतीने भूकंपा संदर्भातील दहापेक्षा जास्त वेळा अचूक भूकंप सूचना यापूर्वी दिलेल्या आहेत. त्यासाठी नॅचरल इंटेलिजन्स (एनआय)आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय)यांच्या एकत्रित वापरातून अचूक भूकंपाची आगाऊ सूचना देत जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी योगदान यापूर्वी दिलेले आहे. आणि आता हा इशाराही त्याच सामाजिक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून देत आहे.
किकुलॉजीचे हेही भाग वाचा
- किकुलॉजी : 'विषुवदिनानिमित्त समजून घेऊ शेती आणि प्रकाशाचे महत्त्व
- किकुलॉजी : हवामान सजग व्हायचेय, तर ओझोनच्या अद्भुत इलेक्ट्रॉनिक संरचनेची माहिती हवीच
किकुलॉजी- मान्सूनदूत 'इलेक्ट्रॉन'चे तांडव नृत्य सांगते हवामानाची माहिती, जाणून घ्या
किकुलॉजी : 'चांद्रयान ३' मोहीम, बदलणारे हवामान आणि चंद्रावरच्या शेतीची गरज
किकुलॉजी- इलेक्ट्रॉन देतो हवामान अलर्ट, वीज ठरवते पीकांची वाढ
पावसाचा 'बायोट्रॉनिक्स सेन्सर' असतो बागेतला कोकिळ, जाणून घ्या कसा?
अचूक हवामान माहितीसाठी माठ आहेत हवामान शास्त्रज्ञ!
किकुलॉजी : ढगांचा एक्सरे काढणाऱ्या रडार तंत्रज्ञानाने महाराष्ट्रातील शेतकरी कधी समृद्ध होणार?
किकुलॉजी : 'जेट स्ट्रिम'मुळे भाजून निघतेय अमेरिका, चीन आणि युरोप!
भूकंप झाल्यास असे उपाय करा
१. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वापर झाल्यानंतर गॅसचे रेग्युलेटर बंद करावे म्हणजे भूकंप होतांना गॅस लिंक होऊन लागणाऱ्या आगी टाळता येतील.
२. भूकंपामुळे नुकसान कमी करण्यासाठी भांडी आदी व जड वस्तू सुयोग्य पद्धतीने ठेवाव्यात म्हणजे त्या डोक्यावर पडणार नाहीत.
३. मोबाईल चार्ज करून ठेवावा. रात्री इलेक्ट्रिकल पावलं फेल्यूअर झाल्यास अंधारात प्रकाश देऊ शकतील असे इलेक्ट्रॉनिक चार्जेबल बल्ब ट्यूब लाईट चा वापर करावा.
४. भूकंप वेळी तसेच आधी मोबाईल कॉल ड्रॉपचे प्रमाणात वाढ, मोबाईल सिग्नल न मिळणे आदी घटना घडू शकतात.
५. भूकंपामुळे लिफ्ट बंद पाडण्याचा धोका जास्त असतो तेव्हा जिन्याचा वापर करावा. लहान मुले, वृद्ध व आजारी व्यक्ती, गरोदर महिला आदींना मदतीसाठी प्राधान्य द्यावे.
६. घाबरून न जाता बाहेर पडून इतर नागरिकांना मदत, प्रथमोपचार करावी व प्रशासनाला सहकार्य करावे.
भारत देईल जगाला भूकंप अलर्ट!
भारत येत्या काळात संपूर्ण जगाला भूकंप अलर्ट देऊ शकेल. जमिनीपासून ९० किलोमीटर ते ४०० किलोमीटरपर्यंत जाऊ तसे पृथ्वीच्या वरच्या वातावरणात म्हणजे आयनोस्फियर (आयनांबर) च्या डी आणि ई लेयर मध्ये विशिष्ट घटकांची विशिष्ट पद्धतीने मोठी घुसळण भुकंपाआधी होत असते असे संशोधन निष्कर्ष आहेत.
जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी 'आयोनोस्फियरकी सिंटिलेशन' चार सखोलपणे अभ्यास व संशोधन निष्कर्ष जगाला एक नवी दिशा देईल. भुकंपाची व हवामान बदलाचा आगाऊ अलर्ट जनतेला अचूकपणे देण्यासाठी व आयोनोस्फिरीक डेटा मिळवित त्यांचे प्रोसेसिंग अधिक सक्षम करण्यासाठी 'नेटवर्क उभारणी' करता मोठ्या संख्येने सॅटेलाईट अवकाशात पाठविण्याची आवश्यकता आहे. भूकंपाची अचूक म्हणजे अक्षांश रेखांशनुसार स्थान तसेच दिवस व वेळ आणि तीव्रतेसह माहिती देणे नजिकच्या काळात भारतात शक्य होईल हा विश्वास वाटतो.
-प्रा. किरणकुमार जोहरेके.टी.एच.एम. कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक, मो. नं. 9168981939, 9970368009kirankumarjohare2022@gmail.com