Lokmat Agro >हवामान > किकुलॉजी: सावधान, थंडीमुळे वाढतेय धुके, अशी सांभाळा आपली पिके

किकुलॉजी: सावधान, थंडीमुळे वाढतेय धुके, अशी सांभाळा आपली पिके

Kikulogy: how to save crop from fog revels Prof Kirankumar Johare | किकुलॉजी: सावधान, थंडीमुळे वाढतेय धुके, अशी सांभाळा आपली पिके

किकुलॉजी: सावधान, थंडीमुळे वाढतेय धुके, अशी सांभाळा आपली पिके

(किकुलॉजी, भाग १५) : शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर.

(किकुलॉजी, भाग १५) : शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर.

शेअर :

Join us
Join usNext

जगाची लोकसंख्या ८ अब्ज झाली आहे, मात्र यातील एक तृतीयांश लोक रोज उपाशी झोपतात. अशा वेळी भारतातील १.४७ अब्ज जनतेची भूक भागविण्यासाठी केवळ देशाच्या क्षेत्रफळाच्या ४३ टक्के असलेली व सातत्याने घटणारी कृषी भूमी आहे. जगाच्या कल्याणासाठी अन्नसुरक्षिततेसह गुन्हेगारी नियंत्रणाची फार मोठी जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. येत्या काळात 'नेशन फर्स्ट'साठी शेतकऱ्यांची भूमिका अत्यंत निर्णायक ठरणार आहे. अशावेळी दरवर्षी मोठ्याप्रमाणात म्हणजे किमान १० ते २० टक्के आणि प्रदेशानुसार अनेकदा ८० ते ९० टक्के अन्नधान्य व पिकांचे नुकसान करणाऱ्या धुक्याचा धोका भारतात रब्बी पिकांना संभवतो. तसेच जगभरातील शेतीला देखील धुक्याचा फटका बसतो हे समजून त्यावर तंत्रज्ञानाने उपाययोजना करणे आवश्यक आहे.

धुके पडणे ही एक नैसर्गिक  प्रक्रिया आहे. अनेकदा दाट धुक्यात अगदी समोर असलेली व्यक्ती देखील दिसू शकत नाही. वाहतुकीचा खोळंबा, विमानांची उड्डाणे रद्द होणे, रेल्वे अपघात आदीस धुके कारणीभूत ठरते. धुक्याचे अस्मानी संकट पिकांची नासाडी करीत महागाई वाढविते. धुक्याबाबत ‘अलर्ट’ देणाऱ्या यंत्रणेची सातत्याने मागणी भारतीय शेतकरी करीत आला आहे. धुके पडण्याच्या आधीच पिकाच्या संरक्षणाची काळजी घेणे आवश्यक आहे. धुक्यामुळे एकट्या महाराष्ट्रात दरवर्षी ७०० ते १००० टनांपेक्षा अधिक निर्यातक्षम द्राक्षांचे व किमान दहा कोटी रुपये रकमेचे ठरलेले सौदे स्थगित झालेत. धुक्यात वाहन चालवताना दक्षता गरजेची आहे.

किकुलॉजी : आज खंडग्रास चंद्रग्रहण, जाणून घेऊ ग्रहणांचा पीकपाण्यावर परिणाम
 
धुके म्हणजे काय?
धुके (fog) म्हणजे पाणी आणि बर्फाचे अत्यंत सुक्ष्मकणांचे तरंगते थर होय. धुके म्हणजे जमिनीलगत तरंगते ढगच होय. व्हीजिबिलीटी (Visibility) म्हणजे ‘दृष्यमानता’ कमी करण्यास धुके कारणीभूत ठरते. ‘किमान एक किलोमीटर वरील द्दष्य न पाहता येण्यासारखी स्थिती म्हणजे धुके’ आहे अशी शास्त्रीय भाषेत धुक्याची व्याख्या करता येते. दाट धुक्यात ५० मीटर अंतरावरील दृश्य ही पाहणे कठीण होते.
 
धुक्याचा पिकाच्या वाढीवर कसा परिणाम होतो?
धुक्यामुळे सूर्यप्रकाशाचा प्रवेश कमी होतो, प्रकाश संश्लेषणावर परिणाम होतो आणि पिकाची वाढ मंदावते तसेच एकंदर राष्ट्रीय आणि जागतिक कृषी अर्थव्यवस्थेवर तसेच अन्नसुरक्षिततेला धोका निर्माण होत महागाई वाढत सर्वसामान्य जनतेवर थेट परिणाम होतो.
 
धुके पडण्यामागे महत्त्वाचे घटक कोणते? 
थंडीत हवेतील आर्द्रता शंभर टक्के झाली तरी धुके निर्माण होते. मात्र ९५ टक्क्यापेक्षा कमी आर्द्रता असतांना देखील धुके पडू शकते. बाष्पाचा मुबलक पुरवठा असतांना पाण्याचा गोठण बिंदू आणि वातावरणाचे तापमान यात ढोबळमानाने अडीच डिग्री सेल्सिअस इतका तापमानातील फरक आढळल्यास धुके निर्मितीस अनुकूल स्थिती तयार होते. थंडीत धुके पडण्यामागचे हेच कारण होय.
 
मुबलक पाणी आणि त्याचे बाष्पीभवन होण्यासाठी लागणारे तापमान, वाऱ्याची दिशा व वेग अशा अनेक गोष्टींवर धुके अवलंबून असते. धुक्यासाठी बाष्पाचा पुरवठा हा जवळचा समुद्र, नदी, तलाव, ओढा किंवा तळ्यातील पाण्यापासून होतो. अनेकदा सुर्याची उष्णता देखील जमिनी पर्यंत पोहचण्यास दाट धुके हे अडथळा ठरते. ढगाळ वातावरणात दिवस धुक्याची चादर अनेक पसरते. दहा-पंधरा डिग्री सेल्सिअस तापमानात देखील धुके पसरलेले दिसून येते.
 
सर्वात जास्त धुके कोठे पडते? 
आइसलॅंड (Island) येथील ‘ग्रँड बँकस्’ (Grand Banks) हे जगातील सर्वात जास्त धुके असणारा प्रदेश होय. जमिनीवर सर्वाधिक धुके असलेल्या प्रदेशात अर्जेंटिना, न्यूफाउंडलँड, लॅब्राडोर व पाँइंट रेयज, कॅलिफोर्निया या ठिकाणांचा समावेश होतो. येथे वर्षातील २०० दिवस धुके आढळते. अमेरीकेतील कॅलिफोर्निया येथील पॉइंट रेयज हे असे क्षेत्र आहे जेथे सर्वात जास्त धुके असते. वर्षातून २०० दिवसांपेक्षा जास्त धुके असलेले हे जगातील हे दुसरे ठिकाण आहे.
 
धुक्यासाठी विशिष्ट पिके जास्त असुरक्षित आहेत का?
धुके जवळपास सर्वच पिकांवर विपरीत परिणाम करते. असे असले तरी धुक्यासाठी काही म्हणजे विशिष्ट पिके जास्त असुरक्षित किंवा धोक्याची आहे विशेषत: तांदूळ आणि गहू यांसारख्या काही पिकांचे धुक्यामुळे जास्त नुकसान होते. याशिवाय बटाटा, कांदा, टोमॅटो, द्राक्ष आणि इतर भाजीपाला व फळबागा यांच्यावर धुक्याने बुरशीजन्य रोग पसरतात. कारण ही पिके नुकसान होण्यास जास्त संवेदनशील असतात. यांचे कारण त्यांना चांगल्या वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश आवश्यक असते. डाळींब, द्राक्ष आदी पिकांसाठी तसेच कांदा आणि बटाट्यासाठी देखील धुके एक नंबरचा शत्रू ठरते. पंजाब मधील शेतकरी दरवर्षी धुक्यामुळे शेकडो टन बटाटा खराब झाल्याने रस्तावर ओतून देतो. धुक्याने द्राक्षाचे मणी देखील तडकतात. भाजीपाला धुक्याने लवकर सडतो.
 
धुक्यामुळे पिकांवर कोणते रोग जास्त होऊ शकतात का? 
धुक्याच्या दीर्घकाळ संपर्कामुळे बुरशीजन्य रोगांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते, परिणामी पिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. धुके असतांना आणि धुके निवळतांना दवबिंदूच्या रूपात जमा होणारे पाणी अन्न-धान्य व पिकांच्या नासाडीस कारणीभूत ठरते. पिकांवर बुरशीचे अनेक प्रकार धुक्यामुळे उद्भवतात. करपा, तांबेरा, डाऊनी, भूरीचा प्रादुर्भाव, पांढरी माशी व तुडतुड्यांचा प्रादुर्भाव धुक्याने वाढतो.
 
शेतकरी त्यांच्या पिकांवर धुक्याचा परिणाम कसा कमी करतात?
शेतकरी धुके-प्रतिरोधक पीक वाण निवडून आणि लागवडीचे वेळापत्रकाचे धुक्याच्या दिवसांचा विचार करत नियोजन व समायोजन करत ‘स्ट्रॅटेजिक प्लॅंनिंग’ने विविध धोरणांचा वापर करीत धुक्याचा धोका टाळू किंवा कमी करू शकतात.
 
धुक्याचा ग्रामीण भागातील पशुधनावर परिणाम होतो का?
धुके आणि जनावरांची चाऱ्याची उपलब्धता तसेच एकंदर जनावरांना चरण्यासाठी उपलब्ध कुरणक्षेत्र यांच्या परिस्थितीवर विपरीत परिणाम करते. तसेच दृश्यमानता कमी झाल्याने पशुधनाच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो.
 
शेतीमध्ये धुक्याचे फायदे आहेत का?
जास्त धुके हानीकारक असू शकते, तर मध्यम धुके जमिनीतील ओलावा वाढवू शकते, तसेच बाष्पीभवनाचा वेग घटवून काही प्रमाणात जलसाधा वाढ निर्माण होण्यास मदत करते. यामुळे भौगोलिक परिस्थितीनुसार काही पिकांना फायदा होतो.
 
धुक्याचा शेतीची यंत्रे, अवजारे आणि उपकरणांवर कसा परिणाम होतो? 
धुक्यामुळे शेतीची यंत्रे, अवजारे आणि उपकरणे यातील धातूच्या पृष्ठभागावर गंज चढतो. योग्य स्टोरेज आणि देखभाल पद्धतींच्या गरजेवर यामुळे भर देणे आवश्यक बनते.
 
धुक्याबाबत तंत्रज्ञानामध्ये प्रगती झाली आहे का?
धुके तयार होताना प्रदेश निहाय परिस्थिती ही एखाद्या कोड्यासारखी अनाकलनीय ठरते. आधुनिक हवामान माहिती साधने शेतकऱ्यांना धुक्याच्या घटनांची आगाऊ अचूक सूचना देण्यासाठी मदत करते. यामुळे आवश्यक उपाययोजना सक्षम व सुयोग्य प्रकारे जगभर शक्य होत आहे.

उत्तर प्रदेशातील अलाहाबाद सारख्या ठिकाणी पंधरा मिनिट ते अर्धा तास इतक्या कमी वेळात अचानक धुके पसरते असा अनुभव आहे. भारतात तुलनेने कमी दिवस धुके दाटते, मात्र धुके दूर करण्यासाठी कुठलीही यंत्रणा अद्याप भारतात विकसित झालेली नाही. धुक्याचा अभ्यास या विषयावर हवामान विभागाद्वारे दरवर्षी दिल्ली येथे आयोजित कार्यशाळेत सहभागी होण्यास देखील संशोधकांची ‘टंचाई’ आहे हे वास्तव‌ आहे.
 
धुके असताना शेतकऱ्यांनी सुरक्षिततेची काय खबरदारी घ्यावी? 
प्रकाश परावर्तित करणारे मार्कर वापरणे, यंत्रसामग्रीची किंवा वाहनांचा वेग कमी करणे आणि हवामानाच्या ताज्या व अपडेटेड माहितीवर लक्ष ठेवणे आणि त्यानुसार शेतीच्या कामांचे नियोजन करणे ही महत्त्वाची खबरदारी शेतकऱ्यांनी घेणे आवश्यक आहे.
 
धुक्याचा शेतकऱ्यांनी कसा सामना‌ करावा?
१) धुक्यापासून धान्याचे रक्षण आवश्यक आहे, त्यासाठी काही वातावरण प्रक्रिया बदल घडविणारे म्हणजेच ‘वेदर मॉडिफिकेशन’ तंत्रोपाय करता येणे शक्य आहे. धुके असताना धान्याच्या कोठाराचे, शेताचे तापमान वाढविण्यासाठी ‘हॅलोजन बल्ब’ सारखे उष्णता देणारे बल्ब लावण्याची व्यवस्था उपयोगी ठरू शकते.

२) शेताच्या कडेला, मोकळ्या जागी शेकोटी पेटविणे ही धुके कमी करण्यास उपयोगी ठरू शकते. मात्र हे उपाय करत असताना पिकांना आग लागणार नाही याची दक्षता घेणे अत्यंत आवश्यक आहे.

३) द्राक्षाचे मणी किंवा फळ भाज्या धुक्याने खराब होऊ नये म्हणून बाष्प टिपणारे टिपकागद वापरता येणे शक्य आहे. वृत्तपत्राच्या कागदाचा उपयोग देखील आच्छादनासाठी टिप कागदासारखा  करता येवू शकतो.

 ४) धुक्यापासून रक्षणासाठी मोठे मेनकापड, पॉलीथिनची चादर अथवा ताडपत्रीचा वापर करून धान्य झाकणे शक्य आहे. मात्र धान्याला अळई अथवा किड लागू नये या करीता धुके निवळताच असे आच्छादन दूर करून वेळोवळी तपासणी करणे आवश्यक आहे.

५) पाश्चिमात्य देशात अनेकदा विद्युतभार ती अणूरेणू सोडणारे यंत्र म्हणजे ‘आयन जनरेटर’ वापरून धुके दूर करतात.
धुक्याशी संबंधित समस्यांना सामोरे जाण्यासाठी पॉलिसी मेकर (धोरणकर्ते) शेतकऱ्यांना कसे मदत देऊ शकतात?
धुके-प्रतिरोधक पिकांवरील संशोधनाला चालना देणारी धोरणे बनवता येतील. धुक्यापासून संरक्षणात्मक उपायांसाठी सबसिडी सारखे आर्थिक मदत देणे आणि ग्रामीण पायाभूत सुविधा वाढवणे फायदेशीर ठरू शकते. धुक्याचा बघत अक्षांश रेखांश‌ आणि वेळेनुसार अचूक हवामान माहिती देणे शक्य आहे.

 'राष्ट्रीय एक्स बॅंड डॉप्लर रडार नेटवर्क' बनवत ते आपत्ती व्यवस्थापन संदेश वहन यंत्रणेशी जोडणी करीत शेतकऱ्यांना मोबाईलवर पोहचविण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी), पीएलसी, स्काडा आदी विविध ॲडव्हान्स इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी च्या एकत्रित वापरातून कृतीशील आराखडा राबविणे कृषी अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक व अपरिहार्य आहे. ‘ग्लोबल कुलिंग’मुळे धुक्याचे क्षेत्र वाढत आहे. म्हणूनच अन्नसुरक्षा आणि राष्ट्रीय अर्थव्यवस्था धोक्यात आणणाऱ्या धुक्यावर उपायांची तातडीने गरज आहे
 
-प्रा. किरणकुमार जोहरे 
के.टी.एच.एम.कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक 
9168981939, 9970368009 kirankumarjohare2022@gmail.com

Web Title: Kikulogy: how to save crop from fog revels Prof Kirankumar Johare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.