Lokmat Agro >हवामान > किकुलॉजी: आकाशातील लाल विजांमुळे मिळतो दुष्काळाचा 'रेड अलर्ट'

किकुलॉजी: आकाशातील लाल विजांमुळे मिळतो दुष्काळाचा 'रेड अलर्ट'

Kikulogy: Red lightning in the sky gives a 'red alert' of drought revels Prof Kirankumar Johare | किकुलॉजी: आकाशातील लाल विजांमुळे मिळतो दुष्काळाचा 'रेड अलर्ट'

किकुलॉजी: आकाशातील लाल विजांमुळे मिळतो दुष्काळाचा 'रेड अलर्ट'

(किकुलॉजी, भाग १६): शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर!

(किकुलॉजी, भाग १६): शेतकरी बांधवांनी हवामान सजग व्हावे यासाठीचे हे सदर!

शेअर :

Join us
Join usNext

डोळ्याची पापणी लवते न लवते तोच सेकंदाच्या हजाराव्या भागात एखाद्या सापाप्रमाणे सळसळत दिसणारी प्रकाश धाव म्हणजे आकाशीय वीज! पृथ्वीवर दर सेकंदाला ४४ वीजा कोसळतात. मनमोहिनी वाटत असली तरी प्रत्यक्ष जीवनात विजेचा जेव्हा सामना होतो व अचानक ती कोसळते तेव्हा केवळ हृदयाचा ठोका चुकत नाही, तर आयुष्याचे सर्व रंग उडून जात राखरांगोळी होते. विजांमुळे वित्तहानी बरोबर ना केवळ मनुष्य तर जनावरांची देखील जीवित हानी होते. मात्र लाल वीजा दुष्काळाचा अलर्ट देतात, तर निळ्या आणि पांढऱ्या शुभ्र विजा या येणाऱ्या चांगल्या मान्सूनची आगाऊ सूचना देतात हे किती जणांना माहीत आहे?

विजांची रंगीत आतषबाजी! 
अनेकदा वीजा वेगवेगळ्या रंगाच्या दिसतात आणि त्या रंगीत विजांचे विज्ञान आहे. फटाक्याच्या रंगीत आतषबाजी प्रमाणे विजांच्या रंगाची आतषबाजी अनेक घटकांवर अवलंबून असते. इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात म्हणजे लाल, नारंगी, हिरवा पिवळा, निळा, पारवा आणि जांभळा अशा सर्व रंगात विजा चमकत असतात. तुलनेने पाहिले तर  पांढऱ्या शुभ्र दिसणाऱ्या विजांचे प्रमाण अधिक आहे. कित्येकदा पांढऱ्यारंगात चमकणाऱ्या विजांच्या कडाभोवती दुसऱ्या रंगासह विजांचा लखलखाट जाणवतो.

किकुलॉजी: सावधान, थंडीमुळे वाढतेय धुके, अशी सांभाळा आपली पिके

अशी होते 'विजेरी' रंगांची उधळण! 
विजेमुळे निर्माण होणारे तापमान हे सूर्याच्या तापमानापेक्षा जास्त असते. एवढ्या मोठ्या तापमानामुळे हवा प्रचंड दबावाखाली प्रसरण पावते आणि मोठा आवाज होतो. वीजा चमकत असताना वातावरणातील हवा जाळत जातात आणि त्यावेळी वायूचे विघटन होते. कुठलाही रंग प्रकाशाची डोळ्यापर्यंत पोहोचणारी तरंगलांबी (वेव्हलेंथ) किंवा कंप्रता (फ्रिक्वेन्सी) यावर अवलंबून असतो. प्रकाश म्हणजे विद्युत चुंबकीय उत्सर्जन! आपल्याला दिसणारा प्रकाश इंद्रधनू रंगांची उधळण करत म्हणजे ३८० नॅनो मीटर या तरंगलांबी पासून निळसर प्रकाशापासून सुरू होत, ७०० नॅनो मीटर असा लालसर प्रकाशापर्यंत पोहचणारा स्पेक्ट्रम किंवा वर्णपट होय, जे आपले मानवी डोळे पाहू शकतात. प्रकाशाच्या संवेदना आपल्या डोळ्यातील दृष्टीपटल आणि चेतापेशीच्या जाळ्याद्वारे मेंदूपर्यंत पोहचतात. ज्या रंगाव्यतिरीक्त इतर तरंगलांबीचा प्रकाश वातावरणात शोषला जातो, त्या रंगाच्या विजा आपल्याला दिसतात हे रंगीबेरंगी दिसणाऱ्या विजांचे साधेसोपे विज्ञान आहे.

'मान्सून'दूत विजा! 
मान्सून पुर्व काळात तीन महिने, तीन-पाच आणि सात अशी एकाच ठिकाणी येणारी विजांची वादळे ही देखील‌ त्या पंचक्रोशीत चांगल्या पावसाची सूचना देतात. मान्सूनच्याआधी आणि मान्सून संपतांना वातावरणातील अस्थिरतेने विजा चमकतात. वातावरणातील अस्थिरतेमुळे वादळी वारे, गारांचा मारा, आकाशात ढगांचे पुंजके गडगडाट व कडकडाट असे विजांचे वेगवेगळ्या रंगछटा वा शेडमध्ये तांडव दिसणे ही मान्सूनपुर्व तसेच मान्सूनउत्तर काळातील पाऊस ओळखण्याची साधीसोपी लक्षणे आणि सर्वसामान्य जनतेला देखील लक्षात येईल अशा खूणा किंवा चिन्हे होत.

राक्षसी 'क्युमुलोनिंबस' ढग! 
'क्युम्युलोनिंबस' (क्युम्युलो म्हणजे उर्ध्वदिशेने वाढत जाणारा आणि निंबस म्हणजे पाणी धारण करणारा असा) हे राक्षसी काळे ढग होय आणि उंचीपेक्षा अनेक पट विस्तीर्ण पसरलेले असतात. अर्ध गोठलेले पाणी, बाष्प आणि बर्फांचे कण यांच्या परस्पर घर्षणातून धन विद्युतभार व ऋण विद्युतभार (चार्ज) निर्माण होतो. ढगांतील वेगवेगळ्या भागांत हा विद्युतभार संचयित होऊन एखाद्या 'बॅटरी सेल' सारखी रचना बनते. सामान्यतः दुर्वाहक मानली जाणारी हवा भेदत मग हा विद्युतभारित उदासीनीकरणासाठी स्थानांतरित होतो. यालाच आपण वीज म्हणतो. दोन ढगांच्या टकरीमुळे किंवा घर्षणातून नव्हे, तर ढगाकडून ढगाकडे अथवा ढगाकडून जमिनीकडे किंवा हवेत वाहणाऱ्या विद्युत प्रवाहामुळे विजांची निर्मिती होते.

विजांबरोबर गारांचा मारा! 
विजांचा लखलखाट होतो, तो केवळ अस्थिर वातावरण उर्ध्व दिशेने वाढत जाणारा पाणीदार क्युमुलोनिंबस ढगांमुळे! क्युमुलोनिंबस ढग जमिनीपासून साधारणतः दोन किलोमीटरवर अंतरापासून सुरू होऊन बारा आणि कधी कधी तर पंधरा किलोमीटरपेक्षा अधिक उंचीपर्यंत वाढत जातात. परिणामी याच क्युमुलोनिंबस ढगांमध्ये बाष्पाचे व पाण्याचे कण हे सांद्रीभवन (Condensation) होत एकत्र येऊन गारा पडतात. क्युमुलोनिंबस ढग हे नेहमी मान्सून पूर्व आणि मान्सून उत्तर काळातच दिसून येतात. मान्सून काळात वातावरण स्थिर राहते त्यामुळे मुख्यत: मसाला डोशाप्रमाणे एकाच रंगात निंबोस्ट्रेटस प्रकाराचे ढग दिसून येतात आणि त्यावेळी विजा चमकताना दिसत नाही.

रंग बदल!

  • शेतकऱ्यांच्या जीवनात रंग भरणाऱ्या आणि जीवनाचे रंग बदलत इंद्रधनू छटा दाखविणाऱ्या विजांचे रंग बदलण्याचे असंख्य घटक कारणीभूत ठरतात.
  • वातावरणातील धुलीकण, धुके, धूर, बर्फाचे कण, गारा, सूर्यप्रकाश, चंद्र प्रकाश, विविध पथदिप किंवा इतर उजेड यामुळे देखील विजांचा रंग वेगळा भासतो.
  • वीज पडतांना वातावरणातील विविध वायूंचे विघटन होत, त्याचे आयन बनताना स्थानिक हवामानानुसार वायू-प्रदूषणाच्या घटकांचे प्रकार व प्रमाण या वर देखील विजांचा रंग अवलंबून असतो.
  • जेव्हा विजांचे तापमान जास्त असते तेव्हा त्या पांढऱ्याशुभ्र किंवा निळसर दिसतात तर कमी तापमानाच्या वीजा तांबूस किंवा लालसर दिसतात.
  • जवळून लालसर वाटणाऱ्या वीजा दूरून पांढऱ्या किंवा दूधी रंगाच्या भासण्यामागे वीजा व वेगवेगळ्या व्यक्तींच्या पाहतांना होणारा कोन हा महत्वाचा घटक आहे.
  • कधीकधी वीजा चमकतांना पांढरा रंग असलेल्या क्षणिक विजांचा प्रकाश पाण्याच्या थेंबातून प्रकाशाचे पृथ्थकरण झाल्याने एकच वीज वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या रंगाची भासू शकते ही देखील शास्त्रीय गंमत आहे.
  • सकाळी किंवा सायंकाळी जास्त अंतर कापत सूर्य प्रकाशाच्या होणाऱ्या वक्रीभवनाप्रमाणेच क्षिजिजा जवळच्या मात्र दूरवर चमकणाऱ्या वीजा अनेकदा गुलाबी किंवा केसरी रंग छटांमध्ये दिसतात.
  • पिवळ्या, गुलाबी तसेच हिरव्या रंगात चमकणाऱ्या वीजा क्वचितच पहायला मिळतात. पिवळ्या रंगाच्या विजा या कमी पावसात किंवा वातावरण कोरडे धुळ उडतांना दिसू शकतात. तर गुलाबी व हिरव्या रंगाच्या विजा अस्थिर वातावरणात हिमवादळांमध्ये, स्नोफाॅल होतांना दिसू शकतात.
  • विजा ज्या वस्तूवर कोसळतात व ती वस्तू जळत असतांनाच पुन्हा त्याच जागी अनेकदा विजा कोसळण्याची पुनरावृत्ती होते. अशावेळी देखील त्या वस्तूंच्या विघटनातून निर्माण होणाऱ्या प्रकाशावरही दिसणारा रंग अवलंबून असतो. म्हणूनच विद्युत खांबावर व उच्च दाबाच्या विद्युत प्रवाहावर किंवा उर्जा केंद्रावर तसेच ट्रान्सफॉर्मर (रोहित्र) आदीवर कोसळणारी विजांच्या ठिणग्या हिरव्या, पिवळ्या रंगांच्या छटांमध्ये दिसतात.
  • दोन वीजा एकाच रंगाच्या कधीच नसतात. इतकेच नाही तर एकाच विजेच्या वेगवेगळ्या शलाका देखील विविध रंगछटा घेत अवतरतात.
  • विजांचे फोटो काढतांना कॅमेऱ्याच्या क्षमतांनुसार व प्रिंटींगच्या प्रकारानुसार देखील विजांचे रंग छायाचित्रणात वेगळे दिसू शकतात. 

लाभदायक वीजा! 
नायट्रोजनची विविध ऑक्साईडस पाण्यात विरघळून पिकांची वाढ होण्यास मदत करीत खतांचा कमी वापर करावा लागेल याचे संकेत देत मार्गदर्शन करीत खुणावतात, याबद्दल शेतकऱ्यांना पिक नियोजन करतांना माहिती असणे आवश्यक आहे.

विजांचे विज्ञान समजून घेण्यासाठी भारतासह जगभर संशोधन सुरू आहे. विजांमध्ये चेतना (Consciousness) किंवा संवेदना असतात असे ही काही शास्त्रज्ञांचे मत‌ असून‌ ग्रहांवर विजांचे चमकते व त्यांचा आवाज‌ हा‌ अंतराळातील संवाद व दूरदूर पर्यंत होणारा संवाद आहे असे ही काही शास्त्रज्ञांचे वैज्ञानिक निष्कर्ष आहेत. कदाचित यामुळेच विविध संस्कृतींमध्ये हजारो वर्षांपासून विजांना‌ देवत्व प्रदान केले गेले आहे.   मात्र शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी चमकणाऱ्या विजा या मानवी मनाप्रमाणेच चंचल, वेगवान धावणाऱ्या, अद्भुत, रंजक आणि तितकीच रहस्यमय आहेत, कदाचित यामुळेच त्यांचे विविध रंग आपल्याला 'सतर्क' करीत सावधानता बाळगण्याचा इशारा करतात.

प्रा. किरणकुमार जोहरे
आंतरराष्ट्रीय हवामान संशोधक, भौतिकशास्त्रज्ञ
के.टी.एच.एम.कॉलेज, इलेक्ट्रॉनिक सायन्स विभाग, नाशिक
संपर्क: 9168981939, 9970368009, ई-मेल:  kirankumarjohare2022@gmail.com

Web Title: Kikulogy: Red lightning in the sky gives a 'red alert' of drought revels Prof Kirankumar Johare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.