Join us

मराठवाड्याचे साप्ताहिक हवामान कसे असेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2024 6:24 PM

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कसे राहणार आहे? त्यानुसार पीक व्यवस्थापन कसे करावे? जाणून घेऊ या.

प्रादेशिक हवामान केंद्र,मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाडयात पुढील सात दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. मराठवाडयात दिनांक 01 व 02 फेब्रुवारी रोजी किमान तापमानात किंचित घट होऊन त्यानंतर किमान तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.

विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दिनांक 03 ते 09 फेब्रुवारी दरम्यान पाऊस सरासरीएवढा, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

दिनांक 04 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान पाऊस सरासरी पेक्षा कमी, कमाल तापमान व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे.

सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.

टॅग्स :मराठवाडापीक व्यवस्थापनशेतकरी