Join us

जाणून घ्या, वीर धरणाच्या पाणीसाठ्याची परिस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2023 12:57 PM

गेली महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिली होती गेली. दोन दिवस आता हलक्या सरी कोसळत आहेत.

पुणे जिल्ह्यातील पुरंदर, बारामती, इंदापूर तसेच सातारा जिल्ह्यातील खंडाळा, फलटण व पुढे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची जीवनदायी असलेल्या नीरा नदीकाठच्या शेतकऱ्यांसमोर दुष्काळाचे सावट वाढत असल्याचे चित्र आहे. जून, जुलै, ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यातील दहा दिवस सरले तरी समाधानकारक पाऊस नसल्याने वीर धरणाची पातळी अवघे ५८.५८ टक्क्यांवर आली आहे. तर, ऐन पावसाळा सरत आला तरी वीर धरणातून एकदाही नदीपात्रात पाण्याचा विसर्ग न केल्याचे शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

गेली महिनाभरापासून पावसाने हुलकावणी दिली होती गेली. दोन दिवस आता हलक्या सरी कोसळत आहेत. नीरा पाटबंधारे विभागाकडून शुक्रवारी सायंकाळी देण्यात आलेल्या माहितीनुसार वीर धरण ५८.५८ टक्के म्हणजे ५.५१२ द.ल.घ.मी. एवढा झाला आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात अशी स्थिती वीस वर्षांपूर्वी होती.

नीरा खोऱ्यातील धरणात ९९.५७ टक्के उपयुक्त पाणीसाठाशुक्रवारी दि. ८ अखेर नीरा खोऱ्यातील नीरा-देवघर धरणात ११ हजार ६७९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ९९.५७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी ११ हजार ७२९ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. भाटघर धरणामध्ये २२ हजार ४२८ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा म्हणजेच ९५.४३ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच दिवशी २३ हजार ५०२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात १०० टक्के पाणीसाठा होता.

वीर धरणामध्ये या यावर्षी ५ हजार ५१२ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा आहे. म्हणजेच ५८५८ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. मागील वर्षी याच तारखेला ९ हजार ४०७ दशलक्ष घनफूट उपयुक्त पाणीसाठा अर्थात १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता. तर, गुंजवणी धरणात आज रोजी ३ हजार २८१ दशलक्ष घनफूट म्हणजेच ८८.९२ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी याच दिवशी ३ हजार ६९० दशलक्ष घनफूट म्हणजेच १०० टक्के पाणीसाठा उपलब्ध होता, अशी माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

- नीरा नदीवरील धरण साखळीत ऑगस्ट महिन्याच्या सरासरीच्या तुलने पावसाचे प्रमाण नगण्य आहे. नीरा-देवघर, भाटघर, वीर धरणात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यातही पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे.- नीरा खोऱ्यातील शेवटचे धरण असलेल्या वीर धरणाची शुक्रवार दि. २८ रोजी गतवर्षा पेक्षा सरासरी ४२ टक्क्यांनी पाणीपातळी कमी असल्याचे आकडेवारीवरून दिसत असल्याने याचा परिणाम रब्बी व उन्हाळी हंगामाच्या पिकांना द्यावयाच्या पाण्यावर होणार असल्याची चिंता आहे.- पावसाचे प्रमाण कमी असतानाही नीरा डावा कालवा ८२७ क्युसेकने, तर उजवा कालवा १,५५० क्युसेकने आवर्तन सुरु आहे. यामुळे नव्वदी गाठलेले वीर धरण आता ५८ टक्क्यांवर आले आहे. त्यामुळे यावर्षी नीरा डावा व उजव्या कालव्यावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांना उन्हाळी आवर्तन कमी मिळू शकते अशी दाट शक्यता आहे.

टॅग्स :धरणपाऊसपुणेसातारापाणी