Lokmat Agro >हवामान > Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Kolhapur Flood Updates What is the water level of Panchgange in Kolhapur? What is the risk of flooding? Know in detail | Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Kolhapur Flood Updates : कोल्हापुरात पंचगंगेची पाणीपातळी किती? किती आहे पुराचा धोका? जाणून घ्या सविस्तर

Panchaganga River : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Panchaganga River : कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्यास पाणी पातळी आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शेअर :

Join us
Join usNext

Kolhapur Panchaganga River Flood Latest Updates :   राज्यातील पश्चिम घाट आणि कोकण परिसरात मागच्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग  या जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे.  कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून धोक्याच्या पाणीपातळीपर्यंत पाणी येऊन ठेपले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

दरम्यान, कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगेची आजची (ता. २१) पाणीपातळी समोर आली असून अनेक भागांत धोक्याच्या पाणीपातळीच्या जवळपास पाणी पोहोचल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर कासारी, भोगावती, वारणा, दूधगंगा, वेधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा आणि ताम्रपर्णी नद्यांची सध्याची पाणीपातळी आणि धोक्याची पाणीपातळीही समोर आली आहे. 

(खालील पाणीपातळी २१ जुलै रोजी सकाळी ९ वाजता समोर आलेल्या आकडेवारीनुसार आहे.)

पंचगंगा नदी 
(धोका पातळी/आत्ताची पातळी)

  • राजाराम - ५४३.२९m / ५४१.४४ m
  • सुर्वे - ५४३.६२m / ५३८.८२ m
  • रुई - ५३९.५०m / ५३८.१२ m
  • इचलकरंजी - ५३९.९८m / ५३६.८४ m
  • तेरवाड - ५४०.५५m / ५३४.७१ m
  • शिरोळ - ५४२.०७m / ५३२.२७ m
  • नृसिंहवाडी - ५३९.००m/५३१.७४ m


भोगावती नदी
बालिंगा - ५४६.३० m / ५४३.७० m

कासारी नदी
नीटवडे - ५४४.००m / ५४३.३४m

वारणा नदी
शिगाव - ५४६.००m /५४३.३० m

दुधगंगा नदी
कागल हायवे - ५४१.९१m /५३७.६७ m

वेदगंगा नदी
बाणगे पूल - ७.५०m / ६.४० m

हिरण्यकेशी नदी
भडगाव पूल - ७.५०m/ ५.४० m

घटप्रभा नदी
हिंडगाव बंधारा - ७.०० m / ६.५० m

ताम्रपर्णी नदी
कोवाड बंधारा - ६.५०m / ५.४० m

दरम्यान, ज्या नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पाणीपातळीच्या जवळपास पोहोचली आहे असा भागांतील नागरिकांनी दक्षता घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे. 

Web Title: Kolhapur Flood Updates What is the water level of Panchgange in Kolhapur? What is the risk of flooding? Know in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.