Kolhapur Panchaganga River Flood Latest Updates : राज्यातील पश्चिम घाट आणि कोकण परिसरात मागच्या काही दिवसांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली असून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील नद्यांची पाणीपातळी वाढलेली आहे. कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणीपातळीतही वाढ झाली असून धोक्याच्या पाणीपातळीपर्यंत पाणी येऊन ठेपले आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, कोल्हापूर शहरातून वाहणाऱ्या पंचगंगेची आजची (ता. २१) पाणीपातळी समोर आली असून अनेक भागांत धोक्याच्या पाणीपातळीच्या जवळपास पाणी पोहोचल्याचं चित्र आहे. त्याचबरोबर कासारी, भोगावती, वारणा, दूधगंगा, वेधगंगा, हिरण्यकेशी, घटप्रभा आणि ताम्रपर्णी नद्यांची सध्याची पाणीपातळी आणि धोक्याची पाणीपातळीही समोर आली आहे. (खालील पाणीपातळी २१ जुलै रोजी सकाळी ९ वाजता समोर आलेल्या आकडेवारीनुसार आहे.)
पंचगंगा नदी (धोका पातळी/आत्ताची पातळी)
- राजाराम - ५४३.२९m / ५४१.४४ m
- सुर्वे - ५४३.६२m / ५३८.८२ m
- रुई - ५३९.५०m / ५३८.१२ m
- इचलकरंजी - ५३९.९८m / ५३६.८४ m
- तेरवाड - ५४०.५५m / ५३४.७१ m
- शिरोळ - ५४२.०७m / ५३२.२७ m
- नृसिंहवाडी - ५३९.००m/५३१.७४ m
भोगावती नदीबालिंगा - ५४६.३० m / ५४३.७० m
कासारी नदीनीटवडे - ५४४.००m / ५४३.३४m
वारणा नदीशिगाव - ५४६.००m /५४३.३० m
दुधगंगा नदीकागल हायवे - ५४१.९१m /५३७.६७ m
वेदगंगा नदीबाणगे पूल - ७.५०m / ६.४० m
हिरण्यकेशी नदीभडगाव पूल - ७.५०m/ ५.४० m
घटप्रभा नदीहिंडगाव बंधारा - ७.०० m / ६.५० m
ताम्रपर्णी नदीकोवाड बंधारा - ६.५०m / ५.४० m
दरम्यान, ज्या नद्यांची पाणीपातळी धोक्याच्या पाणीपातळीच्या जवळपास पोहोचली आहे असा भागांतील नागरिकांनी दक्षता घेण्याचा आवाहन करण्यात येत आहे.