Join us

Koyna Dam नवजाला १०२ मिलिमीटर पाऊस, कोयनेच्या पाणीसाठ्यात वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2024 3:03 PM

कोयना धरणात दोन टीएमसीने वाढ पाण्याची आवक वाढली नवजाला १०२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात मंगळवारपासून धुवाधार पाऊस पडत असून २४ तासांत कोयनानगरला १३३ तर नवजा येथे १०२ मिलिमीटरची नोंद झाली. यामुळे कोयना धरणात साठ्यातही जवळपास दोन टीएमसीने वाढ झाली.

बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात २३ टीएमसी साठा झाला होता. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयनानगर येथे १३३ मिलिमीटर पडला. तर एक जूनपासून १ हजार ७८ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

नवजा येथे १०२ तर आतापर्यंत १ हजार २३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच महाबळेश्वरच्या पावसानेही एक हजार मिलिमीटरचा टप्पा पार केला आहे. महाबळेश्वरला २४ तासांत ४५ आणि जूनपासून आतापर्यंत १ हजार २२ मिलिमीटर पाऊस झाला आहे.

धरणक्षेत्रात पाऊस कायम असल्याने कोयनेत पाण्याची आवक वाढली आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास धरणात २१ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते.

अधिक वाचा: Ujani Dam गेल्या २५ दिवसांत उजनीत वाढला किती टीएमसी पाणीसाठा

टॅग्स :कोयना धरणधरणपाणीसातारापाऊसमहाबळेश्वर गिरीस्थान