सातारा : सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणातून मंगळवारपासून अतिरिक्त १ हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
कोयना धरणातील पाण्याची सांगली जिल्ह्यासाठी तरतूद आहे. त्यामुळे मागणीप्रमाणे धरणातून पाणी सोडण्यात येते. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी वाढली आहे.
त्यामुळे दि. ४ मार्च म्हणजे आजपासून अतिरिक्त १ हजार क्यूसेक पाणी धरणातून सोडण्यात येणार आहे, तर सध्या धरणाच्या पायथा वीजगृहातून २ हजार १०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मंगळवारी अतिरिक्त पाणी सोडल्यास सांगलीसाठी ३ हजार १०० क्यूसेक पाणी कोयना नदीद्वारे सोडले जाणार आहे. सध्या धरणात ६९.७८ टक्के पाणीसाठा आहे आणि हाच मागील वर्षी ५८.०५ टक्के इतका होता.
अधिक वाचा: Ujani Dam Water Level : 'उजनी'तील पाणी घटले; धरणाची पाणी पातळी किती टक्क्यांवर?