Lokmat Agro >हवामान > Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

Koyna Dam : Koyna Dam gates at two feet; 21 thousand cusec discharge | Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

Koyna Dam : कोयना धरणाचे दरवाजे दोन फुटांवर; २१ हजार क्युसेक विसर्ग

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे.

कोयना धरणात (koyna dam) पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग (water release update) होत आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५७ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणात पाण्याची आवक कायम असल्याने दरवाजे दोन फुटांवर स्थिर आहेत. त्यामुळे दरवाजे आणि पायथा वीजगृह असे मिळून २१ हजार क्युसेक पाणी विसर्ग होत आहे.

जिल्ह्यात मागील आठवड्यापासून परतीचा पाऊस पडत आहे. पूर्व तसेच पश्चिम भागातही पाऊस चांगलीच हजेरी लावत आहे. आतापर्यंत माण, खटाव, फलटण, कोरेगाव तालुक्यात दमदार पाऊस पडला आहे. तर पश्चिम भागातील कास, बामणोली, तापोळा, कोयना, नवजा, महाबळेश्वरसह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात सलग तीन दिवस धुवाधार पाऊस झाला. सध्या पावसाचा जोर कमी झाला असला तरीही धरणात पाण्याची आवक सुरू असल्याने विसर्ग सुरूच आहे.

शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १०, तर नवाजला २७ आणि महाबळेश्वरमध्ये ५७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. नवजाला ६ हजार ७८३ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर महाबळेश्वरला ६ हजार ४६२ आणि कोयनानगर येथे ५ हजार ५२८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस होत असल्याने आवक सुरू आहे. यामुळे या पावसाळ्यात तिसऱ्यांदा धरणाचे दरवाजे उघडले.

आमच्याशी व्हॉटसअप्प द्वारे जोडण्यासाठी 'या' लिंकवर क्लिक करा.

Web Title: Koyna Dam : Koyna Dam gates at two feet; 21 thousand cusec discharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.