Join us

Koyna Dam कोयना धरणसाठ्यात एका दिवसात किती टीएमसीने वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2024 10:45 AM

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत नवजाला ७० तर महाबळेश्वरला ६३ मिलिमीटरची नोंद झाली.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून, २४ तासांत नवजाला ७० तर महाबळेश्वरला ६३ मिलिमीटरची नोंद झाली. तर कोयना धरणक्षेत्रातहीपाऊस पडत असल्याने पाणीसाठा २५ टीएमसीवर पोहोचला आहे.

धरणसाठ्यात एका दिवसात एक टीएमसीने वाढ झाली आहे. जुलै महिना सुरू झाल्यापासून पश्चिम भागात पावसाची चांगली हजेरी लागत आहे. कोयना, नवजा, महाबळेश्वरसह तापोळा, बामणोली, कांदाटी खोरे परिसरात सतत पाऊस पडत आहे.

यामुळे धरणातील पाणीसाठाही वाढू लागला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८५ मिलिमीटर झाला आहे. तर आतापर्यंत १ हजार २३२ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.

अधिक वाचा: Dudh Anudan दुध अनुदान योजनेसाठी काय आहेत मार्गदर्शक सूचना

टॅग्स :कोयना धरणधरणपाणीसातारापाऊसमहाबळेश्वर गिरीस्थान