Join us

Koyna Dam Water Level: आभाळ फाटल्यासारखा पाऊस कोयनेत २ दिवसांत आलं इतकं टीएमसी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 10:03 AM

जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे २३६, तर महाबळेश्वरला २४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले.

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात आभाळ फाटल्यासारखा पाऊस होत असून, सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे २३६, तर महाबळेश्वरला २४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर कोयना धरणात दोन दिवसांत १० 'टीएमसी'ने पाणीसाठा वाढला आहे.

सोमवारी सकाळी पाणीसाठा ६१ टीएमसी'जवळ पोहोचला होता. त्याचबरोबर पावसाने इमारत, झाडे पडू लागली आहेत. कन्हाड तालुक्यात नदीची पाणीपातळी वाढल्याने नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले आहे.

सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७६ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर जूनपासून आतापर्यंत २ हजार ५६९ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर नवजा येथे आतापर्यंत ३ हजार ८३ तर महाबळेश्वर येथे २ हजार ५०४ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

या पावसामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सोमवारी सकाळच्या सुमारास सुमारे ७० हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. तर धरणातील पाणीसाठा ६०.४२ टीएमसी झाला आहे.

अधिक वाचा: सततच्या मुसळधार पावसाने किती झाला राज्याचा एकूण पाणीसाठा

टॅग्स :कोयना धरणधरणपाणीपाऊससातारामहाबळेश्वर गिरीस्थान