सातारा : जिल्ह्यात पाऊस वाढत असून हवामान विभागानेही शनिवारपर्यंत ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यामुळे पावसाच्या प्रमाणात वाढ होणार आहे. तर गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत नवजा येथे १२४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली.
कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. त्यामुळे धरणसाठा ८६ टीएमसीजवळ पोहोचला आहे. तसेच धरणातून विसर्ग कायम असल्याने दरवाजे ९ फुटांवर स्थिर आहेत.
गुरुवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ८८ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर एक जूनपासून आतापर्यंत ३ हजार ७६३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. नवजा येथे आतापर्यंत ४ हजार ४३६ मिलिमीटर पाऊस पडला.
सांगली, मिरज पुन्हा पुराच्या कवेतकष्णा नदीच्या पाणीपातळीत गेल्या दोन दिवसांत वाढ झाली. गुरुवारी पाणीपातळी ४० फूट ६ इंचापर्यंत वाढली. त्यामुळे सांगली, मिरजेच्या नदीकाठी पुराचा सुटणारा विळखा पुन्हा घट्ट झाला आहे. सांगलीतील अनेक ठिकाणांना पुराने वेढले. कोयनेतील विसर्ग चालूच असल्यामुळे पाणीपातळी स्थिर राहणार आहे.