Lokmat Agro >हवामान > Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

Koyna Dam Water Level : Release water for irrigation from these dams in Satara district along with Koyna | Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

Koyna Dam Water Level : कोयनेसह साताऱ्यातील या धरणांतून सिंचनासाठी विसर्ग सुरु

जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.

जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.

शेअर :

Join us
Join usNext

सातारा: जिल्ह्यातील प्रमुख सहा पाणी प्रकल्प अजूनही काठापर्यंत भरले असून, १४१ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे; पण सध्या रब्बी हंगामासाठी पाण्याचा विसर्ग सुरू झालेला आहे.

त्यामुळे पुढील काळात विसर्गही वाढणार असल्याने धरणांतील साठाही कमी होणार आहे. तसेच आठवड्यापासून कोयना धरणातूनसांगली जिल्ह्यातील सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे.

सातारा जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी ही मोठी धरणे आहेत. जिल्ह्याच्या पश्चिम भागात असलेल्या या धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता सुमारे १४८ टीएमसी आहे.

या धरणांतील पाण्यावर सातारा तसेच सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांतील पाणी योजना अवलंबून आहेत. त्यामुळे पावसाळ्यात धरणे भरली की पुढील नऊ महिने चिंता करण्याचे कारण नसते.

त्यातच यावर्षी जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या १२० टक्क्यांहून अधिक पर्जन्यमान झाले. या पावसामुळे प्रमुख धरणांबरोबरच छोटे प्रकल्प भरले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यापर्यंत चिंतेचे कारण राहिलेले नाही.

जिल्ह्यात यावर्षी रब्बी हंगामातील पिके चांगली आलेली आहेत. त्यामुळे सध्या पिकांना पाणी देण्याची गरज आहे. यासाठी धरणांतून सिंचनासाठी पाणी सोडण्याची मागणी होत आहे.

जिल्ह्यातील सध्या धोम, कण्हेर, कोयना आणि उरमोडी या धरणांतून पाणी सोडले जात आहे. तर सध्या कोयना धरणात अजूनही १०० टीएमसीवर पाणीसाठा शिल्लक आहे. तर धोममध्ये १२.५९ टीएमसी, कण्हेरमध्ये ९ टीएमसी पाणी शिल्लक आहे.

गेल्यावर्षी कमी पर्जन्यमानामुळे उरमोडी धरणात जेमतेम सहा टीएमसीच पाणीसाठा झाला होता; पण यंदा धरण भरून वाहिले. त्यातच अजूनही धरण काठोकाठ आहे. या धरणावरच दुष्काळी माण आणि खटाव तालुक्यांतील सिंचन योजना अवलंबून आहेत.

सांगलीसाठी १०५० क्युसेक विसर्ग
■ जिल्ह्यातील धोम धरणातून सध्या ७०५, कण्हेर धरणाच्या डावा आणि उजवा कालव्याद्वारे ४७५ क्युसेक पाणी विसर्ग सिंचनासाठी सुरू आहे. तर उरमोडी धरणातून १५० क्युसेक पाणी विसर्ग नदीद्वारे सोडण्यात आलेला आहे.
■ हे पाणीही सिंचनासाठी जात आहे. तर कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक यूनिट सुरू करून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे.
■ हे पाणी सांगली जिल्ह्यातील सिंचन तसेच इतर कारणांसाठी सोडण्यात आलेले आहे. सांगली जिल्ह्याची पाणी मागणी पुढील काळात आणखी वाढणार आहे.

पाणी प्रकल्प स्थिती
धरण : सध्याचा साठा : टक्केवारी : एकूण क्षमता (टीएमसीमध्ये)

धोम : १२.५९ : ९३.२४ : १३.५०
कण्हेर : ९.२४ : ९१.४४ : १०.१०
कोयना : १००.२८ : ९५.२८ : १०५.२५
बलकवडी : ४.०४ : ९९.०४ : ४.०८
तारळी : ५.३४ : ९९.३३ : ५.८५
उरमोडी : ९.७९ : ९८.२७ : ९.९६

अधिक वाचा: महाराष्ट्रातील जिल्हा व सहकारी बँकांचे १४,१०७ कोटी बुडीत; काय आहे प्रकरण पाहूया सविस्तर

Web Title: Koyna Dam Water Level : Release water for irrigation from these dams in Satara district along with Koyna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.